Home Blog Page 155

अहिल्यादेवी जयंती साजरी करण्याच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची ओबीसी जनमोर्चाची मागणी

 



उस्मानाबाद – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती ३१ मे रोजी आहे. महाराष्ट्र शासनाने अहिल्यादेवींच्या कार्य कर्तुत्वाला उजाळा मिळावा जनसामान्यांना त्यांच्या कार्यातून प्रेरणा मिळावी यासाठी जयंती सर्व शासकीय कार्यालयात साजरी करण्यासंदर्भात परिपत्रक काढून आदेश दिले आहेत.मात्र या आदेशाची अंमलबजावणी अनेक शासकीय कार्यालयात होताना दिसत नाही ही दुर्दैवाची बाब असून शासकीय आदेशाचा भंग आहे. येत्या ३१ मे रोजी अहिल्यादेवींची जयंती असून ती साजरी न करणाऱ्यांवर कार्यवाही करावी तसेच जयंती साजरी करण्याच्या परिपत्रकाचे अनुपालन करण्याच्या संदर्भात आदेशित करावे अशी मागणी ओबीसी जनमोर्चाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन करण्यात आली आहे. यावेळी ओबीसी जनमोर्चाचे जिल्हाध्यक्ष सचिन शेंडगे, मध्यवर्ती अहिल्यादेवी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष लिंबराज डुकरे,ज्येष्ठ नेते ॲड.खंडेराव चौरे, माजी नगराध्यक्ष दत्ता बंडगर, बिभीषण लोकरे, इंद्रजित देवकते, अण्णा बंडगर,बालाजी तेरकर, श्याम तेरकर, श्रीकांत तेरकर,गणेश एडके, गणेश सोनटक्के, कुमार थोरात, बालाजी शेंडगे, मिमोह अडसूळ, अनिल ठोंबरे आदि उपस्थित होते.

एसटी सुसाट…उस्मानाबादच्या एसटीने केली 80 हजाराची बेंगलोर फेरी!



(मुकेश नायगांवकर)

उस्मानाबाद- १८

लांबलेल्या संपानंतर कामावर हजर झालेल्या उस्मानाबादच्या आगारातील कर्मचाऱ्यांनी आता जोमाने कामगिरी करत उस्मानाबाद- बेंगलोर गाडीचे 79 हजार रुपयाचे विक्रमी उत्पन्न आणले. उस्मानाबाद बस आगारातील वाहक बी.जे.कांबळे व पी.एम.डोरले,चालक अमोल म्हेत्रे व एम.एस.गायकवाड यांनी ही  विक्रमी उत्पन्नाची कामगिरी केली.याबद्दल

आगारप्रमुख श्री.पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करुन प्रोत्साहित केले. 

उन्हाळी सुट्ट्या आणि लग्नसराईमुळे उस्मानाबाद बसस्थानकांवर सध्या मोठी गर्दी पाहायला मिळत आहे .

उस्मानाबादहून पुण्याला दिवसभरात बारा गाड्या सुटत आहेत .तसेच हैदराबाद ,मुंबई, बोरवली, सुरत, औरंगाबाद, या गाड्या आता वेळेवर धावत असून मोठे उत्पन्न घेऊन येत आहेत त्यामुळे  संपकाळात उस्मानाबाद आगारातील बुडालेल्या उत्पन्नाला थोडाफार हातभार लागून लवकरच नियमित उत्पन्न मिळेल शिवाय प्रवाशांना सोयी व सवलती मिळतील.व प्रवास सुखाचा होईल अशी भावना प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.

दैनिक जनमत १८ मे २०२२ E paper

ग्रामदैवत श्री शंभु महादेवाची यात्रा उत्साहात संपन्न


उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सई भोरे पाटील यांचा करण्यात आला सत्कार 


सलगरा – प्रतिक भोसले

तुळजापूर तालुक्यातील सलगरा (दि.) येथे आयोजित श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यास ८ मे पासून प्रारंभ झाला होता. या मध्ये येथील महादेव मंदिरात उपस्थित भजनी मंडळ, तसेच गावातील ग्रामस्थ व विविध पदांचे पदाधिकारी यांच्या समवेत महापूजा, ज्ञानेश्वरी पारायण, राम कथा, भजन, प्रवचन, नामजप, हरिपाठ, कीर्तन, या सह विविध मान्यवरांची प्रवचने, किर्तने असे विविध कार्यक्रम झाले. या भक्तिमय सोहळ्याची सांगता दि.१५ मे रोजी काल्याच्या किर्तनाने झाली. या वेळी टाळ मृदंगाच्या गजराने श्री शंभु महादेव परिसर दुमदुमून गेला. राम कथा प्रवक्ते म्हणून श्री ह.भ.प.गुरुवर्य महेश महाराज यांनी सेवा पार पाडली तसेच शेवटी काल्याच्या किर्तनाची सेवा पण महेश महाराज यांनीच दिली आणि श्री ह.भ.प. गुरुवर्य ज्ञानेश्वर महाराज यांच्या हस्ते काला वाटप झाला. 


तर सप्ताहनिमित्त ८ ते १५ मे या कालावधीत श्री जय हनुमान भजनी मंडळ आणि संत भगवान महाराज शिवणीकर मृदंग गुरूकुल बाल वारकरी मंडळ लातुर आणि बाल भजनी मंडळ गंधोरा, सलगरा ग्रामपंचायत कार्यालय, यात्रा कमिटी आणि ग्रामस्थ आदींच्या सहकार्याने विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. या सप्ताह सोहळ्यात वैभव महाराज शेरेकर, किशोर महाराज अरजखेडा, बाळु महाराज गिरगावकर, बाबा महाराज काटगावकर, ज्ञानेश्वर महाराज बुलढाणेकर, भुषण महाराज तळणीकर, गुरुवर्य विठ्ठल महाराज वासकर आदींची किर्तन सेवा झाली. हा सप्ताह यशस्वीरित्या पुर्ण करण्यासाठी अनिल मुळे, शिलू लोमटे, संतोष जाधव, आबा केदार, तात्या लोमटे, कुमार लोमटे, विजयकुमार लोमटे, रमेश रवळे, ज्ञानेश्र्वर नगमोडे, ज्ञानेश्र्वर बोधणे, विनायक गुंजकर, विश्वनाथ मुळे, अशोक भरगंडे, दयानंद पांचाळ, राजेंद्र कोळी आदींनी परिश्रम घेतले.


त्या नंतर दि.१५ आणि १६ मे रोजी श्री चा विवाह सोहळा आणि श्री ची भव्य मिरवणुक (छबिना) आणि शोभेची दारू उडवण्यात आली. विवाह सोहळ्यासाठी माधव दशरथ लोमटे आणि संभाजी मुरलीधर मुळे हे प्रमुख मानकरी होते. लग्नसोहळा आणि छबिना पाहण्यासाठी किलज, गंधोरा, वाणेगाव, वडगाव सह पंचक्रोशीतील भाविक मोठय़ा संख्येने दर्शनासाठी येत असतात त्या मुळे यात्रेत कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून दि.१६ मे रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सई भोरे पाटील यांच्या आदेशावरून नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सपोनि सुधीर मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सई भोरे पाटील यांनी ग्रामदैवत श्री शंभु महादेवाचे दर्शन घेऊन यात्रा कमिटीशी संवाद साधला या वेळी त्यांचा सरपंच विष्णु वाघमारे, उपसरपंच प्रशांत लोमटे, अंजली पाटील, प्रतिभा मोरे यांच्या सह उपस्थित मान्यवर आणि यात्रा कमिटी यांच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला. तसेच सपोनि सुधीर मोटे यांनी योग्य प्रकारे पोलीस बंदोबस्त लावल्याबद्दल त्यांचे सुद्धा यात्रा कमिटीने आभार मानले. अशा प्रकारे यंदाची हि यात्रा यशस्वी करण्यासाठी सलगरा ग्रामपंचायत कार्यालय, यात्रा कमिटी आणि ग्रामस्थ यांनी विशेष परिश्रम घेतले. यात्रेमध्ये कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस कर्मचारी धनंजय वाघमारे, लक्ष्मण शिंदे, जितेंद्र कोळी, शिवाजी राठोड, अजय जमादार, बालाजी कांबळे, विशाल सगर यांच्या सह ईतर कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवत यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.

पारेवाडी येथे कीर्तनाने नृसिंह जयंती साजरी

 



मुगाव (प्रतिनिधी)

परंडा तालुक्यातील मौजे पारेवाडी येथे काल दिनांक १५ रोजी नरसिंह जयंती निमित्त ह.भ. प.अमोल महाराज नकाते चुंबळीकर  यांचे  काल्याचे किर्तनाचे आयोजन अनंत शास्ती पौळ (काका) यांचेतर्फे  केले होते. यावेळी नकाते महाराजांनी व्यसनांच्या आहारी जाऊ नका, आई वडिलांची सेवा करा, मोबाईलचा अतिवापर टाळा तसेच लहान मुलांवर योग्य वेळी योग्य ते संस्कार करावे जेणेकरून ते एक आदर्श नागरिक बनतील व समाजाचे व देशाचे नाव मोठे करतील असा संदेश कीर्तनातून दिला.. यावेळी गायनाचार्य ह.भ.प. दत्ता गाढवे, मृदंगाचार्य ह.भ.प. कृष्णा घोगरे, यांची साथ लाभली तर बालटाळकर्यांनी परिसर दनानुन सोडला.

        यासाठी  ह.भ.प. शिवरामा महाराज बिडवे व जय हनुमान मित्र मंडळ पारेवाडी यांनी परिश्रम घेतले…

महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेस रस्त्यावर

महिलांनी चुलीवर भाकरी भाजून केंद्र सरकारचा केला निषेध

परंडा( भजनदास गुडे) महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने चुलीवर भाकरी भाजून केंद्र सरकारच्या विरोधात अंदोलन करण्यात आले.

      राष्ट्रवादी महिला कॉग्रेसच्या मराठवाडा अध्यक्षा वैशाली मोटे व मा.नगराध्यक्ष जाकीर सोदागर यांच्या नेतृत्वाखाली दि १५ मे रोजी टिपू सुलतान चौकात आंदोलन करण्यात आले.

      यावेळी  केंद्र सरकारच्या काळात वाढणारी महागाई पाहता हे आंदोलन करण्यात आले. घरगुती वापराच्या सिलिंडरचे दर खूपच वाढले आहेत. रोज वापर होणाऱ्या पेट्रोल,डिझेलच्या वाढत्या किमतीही हैराण करणाऱ्या आहेत. देशातील वाढणारी महागाई त्याच बेरोजगारीमुळे जीवन जगणे कठीण झाले आहे. इंधन दरवाढीमुळे गृहिणींवर आज पारंपरिक लाकूड फाटा व गवरीवर स्वयंपाक करण्याची वेळ ग्रामीण भागात आली आहे. याचा निषेध म्हणून परंडा तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसने चुलीवर भाकरी केल्या.

      यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभागीय अध्यक्षा वैशाली मोटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष महेबुब शेख,राष्ट्रवादी काँग्रेस युवती प्रदेश अध्यक्षा सक्षणा सलगर,माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर,राष्ट्रवादी कॉग्रेसचे युवकप्रदेश महिला जिल्हाध्यक्षा मनिषा राखुंडे,युवती जिल्हाध्यक्षा स्वाती ध्रुवकर, महिला तालुका अध्यक्ष स्वाती गायकवाड यांनी महागाई विरोधात भाषणे करून केद्र सरकारचा निषेध केला.

     यावेळी मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणा देत गॅस.दरवाढीचा आणि महागाईचा निषेध नोंदवण्यात आला आहे. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरुद्ध अभिनेत्री केतकी चितळे हिने केलेल्या व्यक्तव्याचा निषेध करत राष्ट्रवादी महिला काँग्रेसने या घटनेचा निषेध नोंदवत चितळे यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध नोंदवला आहे.

      यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष ॲड.संदीप खोसे-पाटील, राष्ट्रवादी युवकचे प्रदेश सचिव अमोल काळे, राष्ट्रवादी काँग्रेस मागासवर्गीय सेल जिल्हाध्यक्ष राहुल बनसोडे, सचिन पाटील, बच्चन गायकवाड,तनवीर मुजावर,धनंजय हांडे, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष वाजिद दखनी,माजी नगरसेवक संजय घाडगे,बापु मिस्किन, आप्पा बनसोडे, हनुमंत गायकवाड,शरद झोबांडे, बाबूराव काळे, बाळासाहेब बैरागी, बिभीषण खुने, विजय काळे, मलिक सय्यद,राजकुमार माने,मोहसीन सौदागर,राष्ट्रवादी काँग्रेस युवक शहराध्यक्ष जावेद मुजावर,माजी जिल्हा परिषद सदस्या अनिता जाधव,माजी पंचायत समिती सुषमा शिंदे,माजी नगरसेविका रत्नमाला बनसोडे,माजी नगरसेविका संजना माने,राखी देशमुख,दिपाली रगडे,वैष्णवी बैरागी,अनिता राऊत यांच्या सह महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलंन राष्ट्रवादी सामाजीक विभागाचे जिल्हाध्यक्ष राहूल बनसोडे यांनी केले.

दरवाढ,केंद्र सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे आंदोलन



आंदोलनात बहूसंख्य महिलांनी सहभागी व्हावे-जाकीर सौदागर

परंडा (भजनदास गुडे)इंधन व जिवनावश्यक वस्तुची दरवाढ,केंद्र सरकार च्या विरोधात राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस च्या वतीने १५ मे रोजी सकाळी ११ वाजता टिपू सुलतान चौक, आठवड बाजार परंडा येथे अंदोलन करण्यात आहे.या आंदोलनात वाहूसंख्य महिलांनी सहभागी व्हावे असे अव्हान मा.नगर अध्यक्ष जाकीर सौदागर यांनी केले आहे.

     सदर आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विभागीय अध्यक्षा सौ.वैशालीताई राहुल मोटे यांच्या मार्गदर्शना खाली व राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख,मा.आ.राहूल मोटे,राष्ट्रवादी युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, जिल्हाध्यक्षा मनिषा राखुंडे यांच्या उपस्थिती मध्ये केंद्र सरकारच्या गॅस दरवाढ,पेट्रोल डिझेल,सिएनजी व जीवनावश्यक वस्तु महागाई वाढीच्या धोरणाविरूध्द राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिलांच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे.तरी या आंदोलनासाठी बहुसंख्य महिलांनी उपस्थित राहावे,असे आवाहन माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी केले आहे.