Home Blog Page 130

लोहारा शहरात दही हांडी कार्यक्रम उत्साहात साजरा

लोहारा (यशवंत भुसारे) लोहारा शहरात दरवर्षीप्रमाणे श्रीकृष्ण जन्माष्टमी याही वर्षी शिव मित्र मंडळाच्या वतीने शिवनगर येथे शुक्रवारी १९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता दहीहांडी कार्येक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. 

लोहारा येथील शिवनगर व  शिव मिञ मंडळाच्या वतीने गेले १९ वर्षांपासून दही हंडीचा कार्येक्रम उत्साहात साजरा केला जातो. परंतु कोरोना काळात दही हंडी उत्सवास काही निर्बध आले होते.ते यावर्षी  सर्व निर्बध हाटविण्यात आले त्यामुळे सर्वत्र बालगोपाळात उत्साहा होता. त्यात शहरातील शिवनगर येथे शिव मित्र मंडळाच्या वतीने दहीहांडी गोविंदाचा चार थराचा मानवी मनोरा उभारुन श्रीकृष्णाच्या वेशभुषात मुले तर राधेच्या वेषभुषा परिधान केलेल्या मुली दहीहंडी कार्येक्रमात सुंदर नृत्य करीत गोविंद ,गोपालांच्या जयघोषात  सुरज क्षिरसागर यांनी दही हांडी फोडली. यावेळी नागरीक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

दैनिक जनमत २० ऑगस्ट २०२२ E paper

दैनिक जनमत १९ ऑगस्ट २०२२ E paper

कृषीमंत्री मराठवाड्याचे तर उपमुख्यमंत्री विदर्भाचे तरीही या भागातील शेतकऱ्यांवर अन्याय का?

 


आमदार कैलास पाटील यांचा सभागृहात सवाल

उस्मानाबाद -(18)अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे नुकसान होऊनही जाहीर केलेली मदत अत्यंत तुटपुंजी आहे,2019 साली अशाचप्रकारे कोल्हापुर सांगली येथे नुकसान झाले होते, तेव्हा कोरडवाहु पिकांना 20 हजार 400 रुपयाची मदत देऊन तिथ पिककर्ज माफ केले होते.मग मराठवाडा व विदर्भानी कोणत पाप केले आहे असा सवाल आमदार कैलास घाडगे पाटील यानी सरकारला केला.कृषीमंत्री मराठवाड्यातील तर उपमुख्यमंत्री विदर्भाचे असुनही शेतकऱ्यांना मदतीबाबत दुजाभाव केला जात असल्याचे घाडगे पाटील यानी म्हटले आहे. 

विधीमंडळाच्या अधिवेशनामध्ये विरोधी पक्षाच्या प्रस्तावर आमदार पाटील यानी शेतकऱ्यांच्या मदतीचा मुद्दा उपस्थित करुन सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.आमदार पाटील म्हणाले की,जाहीर केलेली मदत व 2019 रोजी कोल्हापुर सांगली जिल्ह्यातील मदत यामध्ये मोठा फरक आहे.मराठवाडा व विदर्भावरच असा अन्याय का?अस प्रश्न त्यानी केला. सर्व मंडळामध्ये अतिवृष्टी दिसत नसली तरी सततच्या पावसाने पिकाचे नुकसान झाले आहे.सोयाबीन पिक पुर्णतःवाया गेले आहे,त्यामुळे सरसकट सोयाबीनचे पंचनामे करण्याची मागणी आमदार पाटील यानी केली.गोगलगाईमुळे उस्मानाबाद,बीड व लातुर जिल्ह्यातील नुकसान झाले आहे. किडीसाठी फक्त साडेसातशे रुपये दिले जातात.त्यापेक्षा कितीतरी पटीने नुकसान झाले आहे.यावर्षी सोयाबीनवर यलो मोझॅक नावाच्या विषाणुचा प्रादुर्भाव झाला आहे,या विषाणुमुळे पिक पिवळे पडते,त्याला शेंगा लागत नाहीत,शेंगा लागल्या तर त्यात दाणे भरत नाही.त्यामुळे याने देखील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे बोंडअळी लागल्यावर कापसाला मदत केली होती, त्याप्रमाणे या यलो मोझॅकचा समावेश करुन तशी मदत दिली पाहिजे अशी मागणी आमदार घाडगे पाटील यानी म्हटले आहे.जमीन खरडुन गेल्यानंतर एनडीआरएफ व एसडीआरएफच्या निकषानुसार बहुभुधारकाना मदत मिळत नाही, त्यात किमान दोन हेक्टरपर्यंत च्या शेतकऱ्यांचा समावेश करुन मदत करणे आवश्यक असल्याचे मत आमदार घाडगे पाटील यानी व्यक्त केले.याशिवाय शेतकऱ्यांप्रमाणे शेतमजुर देखील पशुधनाचा सांभाळ करतात पण त्याना नैसर्गिक आपत्तीत पशुधनाची जीवीतहानी झाल्यास कुठल्याही प्रकारची मदत मिळत नाही.हे निकष देखील बदलुन शेतमजुरांचाही समावेश करण्याची मागणी आमदार घाडगे पाटील यानी यावेळी केली.

सलगरा, गंधोरा येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ध्वजारोहण



सलगरा,दि.१७ (प्रतिक भोसले) – 

 यंदाच्या स्वातंत्र्य महोत्सवी वर्षानिमित्त तुळजापूर तालुक्यातील सलगरा (दि.) आणि गंधोरा येथे सोमवार, दि.१५ ऑगस्ट रोजी ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले. सलगरा येथे अमृत महोत्सवानिमित्त गावातील ग्रामपंचायत, जि.प. शाळा, प्रा आरोग्य केंद्र, महाविद्यालय, बँक, अंगणवाडी यांसह घरोघरी तिरंगा फडकावून सलगरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात सहभागी होऊन हातात तिरंगा ध्वज घेऊन विद्यार्थ्यांनी गावातून भव्य अशी रॅली काढली, यावेळी देशभक्तीपर घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. आपल्या ध्वजाचा अधिक सन्मान करण्यासाठी ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ उपक्रमांंतर्गत केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाने ‘हर घर तिरंगा’ या कार्यक्रमाला मान्यता दिली होती. या अंतर्गत सर्व भारतीयांना त्यांच्या घरी १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत राष्ट्रध्वज फडकवण्याचे आवाहन करण्यात आले होते. देशभर हा उपक्रम घराघरात पोहचवण्यासाठी केंद्र व राज्य सरकराने विविध शाळा, महाविद्यालये, संस्थाच्या माध्यमातून जनजागृतीचे कार्यक्रम सुद्धा घेतले होते. म्हणुन १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीमध्ये देशभरात “हर घर तिरंगा’’ म्हणजेच ‘घरो घरी तिरंगा’ हा उपक्रम राबविण्यात आला होता. म्हणून त्याच अनुषंगाने तुळजापूर तालुक्यातील सलगरा (दि.) आणि गंधोरा येथे हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांंतर्गत प्रत्येक शासकीय, निमशासकीय व खाजगी आस्थापनांवर तसेच प्रत्येक घर व इमारतींवर स्वयंस्फूर्तीने राष्ट्रध्वजाची उभारणी करायची होती. राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये या साठी ध्वजसंहितेचे काटेकोरपणे पालन करून या उपक्रमांतर्गत गावातील प्रत्येक नागरीकाने आपल्या घरावर राष्ट्रध्वजाची उभारणी करून ‘हर घर तिरंगा’ अर्थात ‘घरो घरी तिरंगा’ या उपक्रमात भारतीय नागरीक म्हणून सक्रिय सहभाग नोंदवून हा उपक्रम निष्ठेने पार पाडायचा असे आवाहन दोन्ही गावांच्या ग्रामपंचायत कार्यालयाकडून करण्यात आले होते. त्या नुसार शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत विविध ठिकाणी ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणासह घरोघरी तिरंगा फडकवण्यात आला.

स्वातंत्र्यदिनाचा अमृत महोत्सव शहरासह तालुक्यात उत्साहात साजरा

 

तहसिलदार रेणूकादास देवणीकर यांच्या हस्ते तहसिल येथील शासकीय ध्वजारोहण

परंडा (भजनदास गुडे )

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव परंडा शहरासह तालुक्यात उत्साहात साजरा करण्यात आला.

     तहसिल कार्यालयात येथील मुख्य शासकीय ध्वजारोहण तहसिलदर रेणूकादास देवणीकर यांच्या हस्ते करण्यात आले.

     यावेळी नायब तहसिलदार प्रदिप पांडूळे,नायब तहसिलदार सुजित वाबळे, संजयकुमार बनसोडे,रमेश गणगे,ॲड.नुरोद्दीन चौधरी,सुभाषसिंह सद्दीवाल,राहुल बनसोडे,नागनाथ नरूटे,रमेश परदेशी,जनार्धन मेहेर,सुभाष शिदे,भागवत डाकवाले,रवि गुडे,तानाजी सांगडे,मंडळ अधिकारी पवार,मंडळ आधिकारी खुळे,तलाठी चंद्रकांत कसाब, तलाठी विशाल खळदकर, तलाठी गुणवंत ढोणे,विनोद चुकेवाड,देवा वाघमारे,नागेश

करळे,जिवन बनसोडे,सुधिर देडगे,आण्णासाहेब बनसोडे यांच्या सह महसुल विभागाचे कर्मचारी नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते .

        पोलिस स्टेशन येथील पोलीस निरीक्षक सुनिल गिड्डे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी सहायक पोलीस निरीक्षक कविता मुसळे,सहायक पोलीस निरीक्षक विक्रांत हिंगे,सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार ससाणे यांच्या सह पोलिस कर्मचारी उपस्थीत होते.

     तर महावितरण उपविभागीय कार्यालय येथील उपकार्यकारी अभियंता अमेय वनारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. 

यावेळी सहाय्यक अभियंता संजीव रोकडे,कनिष्ठ अभियंता सुरज नायर,सहाय्यक लेखापाल सुचीत देशपांडे,उमेश दुरूंदे,चंद्रकांत रणझुणझारे,मधुकर मस्के,विशाल पवार,अशोक विभुते,प्रशांत माने,नागेश गोंजारे,विनोद कुंभार,राजेंद्र वाघमारे, युवराज गोपणे,नितीन चौधरी, रोहित काटवते,शेटे डी.एस, सुदाम ओहाळ,देविदास अलाट,कांताबाई पवार,विठ्ठल पौळ,गुट्टे,परमेश्वर नाईकनवरे,जावेद पठाण,कृष्णा मुळीक,भाऊसाहेब यादव,भोसले काका,उपस्थित होते.

       नगर परिषद कार्यालय येथील मुख्याधिकारी श्रीमती मनिषा वडेपल्ली यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.    

     या वेळी नगर परिषदेचे कर्मचारी ऐश्वर्या म्हणाने,मुनेर जिकरे,किरण शिंदे,गजानन हांगे,महेश कसाब,जलाल मुजावर,संतोष दिक्षीत,संजना सुलाखे,नंदू पाटील,रणजित काशीद,नजीर लुकडे,बादेश मुजावर,मोहण सातारकर,महेश भातलवंडे आदिंसह कर्मचारी उपस्थिती होती.

      पंचायत समीती येथील गटविकास अधिकारी संतोष नागटिळक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी आर.ए.राठोड,प्रशांत वास्ते,सुरज बोडके,नितीन बरबडे,युवराज फासे, श्रीमती रंजना कदम,ए.पी.निबांळकर बी.एम.घोडके,प्रफुल्ल गोडगे, बळीराम घोडके,अगबर तांबोळी, प्रणित कांबळे,अविनाश नलवडे, महेश गटकुळ,श्रीमती जयादेवी कुभार,श्रीमती सुवर्णा वाघमारे, श्रीमती पुणम अंकुशे,श्रीमती संजिवनी नटवे,श्रीमती सुष्मा माने,भारत काळे,उमेश हिगे आदि कर्मचारी उपस्थित होते.

     कमांडो ॲकाडमी येथील ध्वजारोहण पोलीस निरीक्षक सुनिल गिड्डे यांच्या हस्ते करण्यात आले या वेळी पोलीस उपनिरीक्षक कविता मुसळे,मेजर महावीर तनूरे,ॲड.काळे,हभप बालाजी बोराडे,मेसर जगदाळे, मेजर रामगुडे,मेजर बीडवे, पत्रका यांच्यासह विद्यार्थी उपस्थीत होते.

    यावेळी ॲकाडमीच्या वतीने १७५ फुट तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

     या रॅलीचे फित कापून उदघाटन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटनीस मा.आ. सुजितसिह ठाकुर यांच्या ह्रस्ते करण्यात आले.

    या वेळी शिवसेना युवा नेते रणजित पाटील,भाजपा तालुका अध्यक्ष राजकुमार पाटील, भाजपा उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष हनुमंत पाटील, भाजपा युवा नेते संकेतसिंह ठाकुर,प्रशांत गायकवाड,नारायण लीमकर,रामदास गुडे आदी उपस्थीत होते.

      स्वातंत्र्यदिना निमीत्त शहरातील शाळेच्या वतिने काढण्यात आलेल्या प्रभात फेरीतील विद्यार्थीना जमीयत उलेमा ए हिंद चे अध्यक्ष मौलाना जफर काझी यांच्या वतीने टिपू सुलतान चौकात पाणी व बिस्कीटाचे वाटप करण्यात आले.

    यावेळी शहरातील विविध शाळेच्या वतीने स्वातंत्र दिना निमीत्त प्रभात फेरी काढण्यात आली होती या मध्ये शेकडो विद्यार्थी,विध्यार्थीनी सहभागी झाले होते.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमीत्त माजी सैनिक व स्वतंत्र सैनिकांच्या नातेवाईकाचा तहसिलदार यांच्या हस्ते सत्कार.

     स्वतंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त परंडा तालुक्यातील माजी सैनिक व स्वतंत्र सैनिक यांच्या वारस नातेवाईकांचा शाळ, श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन तहसिलदार रेणूकादास देवनीकार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

स्वातंत्र्याच्या सुवर्ण अमृत महोत्सवाचे औचित्य साधून तहसिल परिसरात वृक्षारोपण

     स्वातंत्र्याच्या सुवर्ण अमृत महोत्सवाच्या ७५ व्या वर्धापण दिनाचे औचित्य साधून तहसिल कार्यालयाच्या परिसरात तहसिलदार रेणुकादास देवनीकर व उपस्थीत मान्यवारांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात. आले.यावेळी पत्रकार,विविध राजकीय पक्षाचे पदाधीकारी, महसुलचे कर्मचारी उपस्थीत होते.