Home Blog Page 131

दैनिक जनमत २३ ऑगस्ट २०२२ E paper

दैनिक जनमत २२ ऑगस्ट २०२२ E paper

शिंदे गट शिवसेना जिल्हाप्रमुख पदी पणुरे यांची वर्णी

  

लोहारा (प्रतिनिधी)

लोहारा तालुक्यातील जेवळी येथील सरपंच तथा लोहारा शिवसेना  तालुकाप्रमुख मोहन पणुरे यांची शिंदे गट शिवसेना जिल्हाप्रमुख पदी नुकतीच निवड झाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. गेली १५ वर्षांपासून मोहन पणुरे हे लोहारा शिवसेना तालुकाप्रमुख म्हणून काम करतात ते कडवट कट्टर शिव सैनिक असुन जेवळी गावचे सरपंच असुन ते राज्य सरपंच परिषदेचे धाराशिव जिल्हाप्रमुख म्हणून प्रामाणिक काम करतात.हिंदूह्रदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते असुन लोहारा उमरगा तालुक्याचे आमदार ज्ञानराज चौगुले यांचे अत्यंत विश्वासू खांदे समर्थक आहेत.पणुरे यांची लोहारा तालुक्यावर पकड मजबूत असुन ते राजकारणी खरे दुत आहेत,मोहन पणुरे हे शिंदे गटासामील होताच त्यांच्यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाप्रमुख पदाची मोठी जबाबदारी सोपवल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

लोहारा शहरात दही हांडी कार्यक्रम उत्साहात साजरा

लोहारा (यशवंत भुसारे) लोहारा शहरात दरवर्षीप्रमाणे श्रीकृष्ण जन्माष्टमी याही वर्षी शिव मित्र मंडळाच्या वतीने शिवनगर येथे शुक्रवारी १९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता दहीहांडी कार्येक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. 

लोहारा येथील शिवनगर व  शिव मिञ मंडळाच्या वतीने गेले १९ वर्षांपासून दही हंडीचा कार्येक्रम उत्साहात साजरा केला जातो. परंतु कोरोना काळात दही हंडी उत्सवास काही निर्बध आले होते.ते यावर्षी  सर्व निर्बध हाटविण्यात आले त्यामुळे सर्वत्र बालगोपाळात उत्साहा होता. त्यात शहरातील शिवनगर येथे शिव मित्र मंडळाच्या वतीने दहीहांडी गोविंदाचा चार थराचा मानवी मनोरा उभारुन श्रीकृष्णाच्या वेशभुषात मुले तर राधेच्या वेषभुषा परिधान केलेल्या मुली दहीहंडी कार्येक्रमात सुंदर नृत्य करीत गोविंद ,गोपालांच्या जयघोषात  सुरज क्षिरसागर यांनी दही हांडी फोडली. यावेळी नागरीक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

कृषीमंत्री मराठवाड्याचे तर उपमुख्यमंत्री विदर्भाचे तरीही या भागातील शेतकऱ्यांवर अन्याय का?

 


आमदार कैलास पाटील यांचा सभागृहात सवाल

उस्मानाबाद -(18)अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे नुकसान होऊनही जाहीर केलेली मदत अत्यंत तुटपुंजी आहे,2019 साली अशाचप्रकारे कोल्हापुर सांगली येथे नुकसान झाले होते, तेव्हा कोरडवाहु पिकांना 20 हजार 400 रुपयाची मदत देऊन तिथ पिककर्ज माफ केले होते.मग मराठवाडा व विदर्भानी कोणत पाप केले आहे असा सवाल आमदार कैलास घाडगे पाटील यानी सरकारला केला.कृषीमंत्री मराठवाड्यातील तर उपमुख्यमंत्री विदर्भाचे असुनही शेतकऱ्यांना मदतीबाबत दुजाभाव केला जात असल्याचे घाडगे पाटील यानी म्हटले आहे. 

विधीमंडळाच्या अधिवेशनामध्ये विरोधी पक्षाच्या प्रस्तावर आमदार पाटील यानी शेतकऱ्यांच्या मदतीचा मुद्दा उपस्थित करुन सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.आमदार पाटील म्हणाले की,जाहीर केलेली मदत व 2019 रोजी कोल्हापुर सांगली जिल्ह्यातील मदत यामध्ये मोठा फरक आहे.मराठवाडा व विदर्भावरच असा अन्याय का?अस प्रश्न त्यानी केला. सर्व मंडळामध्ये अतिवृष्टी दिसत नसली तरी सततच्या पावसाने पिकाचे नुकसान झाले आहे.सोयाबीन पिक पुर्णतःवाया गेले आहे,त्यामुळे सरसकट सोयाबीनचे पंचनामे करण्याची मागणी आमदार पाटील यानी केली.गोगलगाईमुळे उस्मानाबाद,बीड व लातुर जिल्ह्यातील नुकसान झाले आहे. किडीसाठी फक्त साडेसातशे रुपये दिले जातात.त्यापेक्षा कितीतरी पटीने नुकसान झाले आहे.यावर्षी सोयाबीनवर यलो मोझॅक नावाच्या विषाणुचा प्रादुर्भाव झाला आहे,या विषाणुमुळे पिक पिवळे पडते,त्याला शेंगा लागत नाहीत,शेंगा लागल्या तर त्यात दाणे भरत नाही.त्यामुळे याने देखील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे बोंडअळी लागल्यावर कापसाला मदत केली होती, त्याप्रमाणे या यलो मोझॅकचा समावेश करुन तशी मदत दिली पाहिजे अशी मागणी आमदार घाडगे पाटील यानी म्हटले आहे.जमीन खरडुन गेल्यानंतर एनडीआरएफ व एसडीआरएफच्या निकषानुसार बहुभुधारकाना मदत मिळत नाही, त्यात किमान दोन हेक्टरपर्यंत च्या शेतकऱ्यांचा समावेश करुन मदत करणे आवश्यक असल्याचे मत आमदार घाडगे पाटील यानी व्यक्त केले.याशिवाय शेतकऱ्यांप्रमाणे शेतमजुर देखील पशुधनाचा सांभाळ करतात पण त्याना नैसर्गिक आपत्तीत पशुधनाची जीवीतहानी झाल्यास कुठल्याही प्रकारची मदत मिळत नाही.हे निकष देखील बदलुन शेतमजुरांचाही समावेश करण्याची मागणी आमदार घाडगे पाटील यानी यावेळी केली.

सलगरा, गंधोरा येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ध्वजारोहण



सलगरा,दि.१७ (प्रतिक भोसले) – 

 यंदाच्या स्वातंत्र्य महोत्सवी वर्षानिमित्त तुळजापूर तालुक्यातील सलगरा (दि.) आणि गंधोरा येथे सोमवार, दि.१५ ऑगस्ट रोजी ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले. सलगरा येथे अमृत महोत्सवानिमित्त गावातील ग्रामपंचायत, जि.प. शाळा, प्रा आरोग्य केंद्र, महाविद्यालय, बँक, अंगणवाडी यांसह घरोघरी तिरंगा फडकावून सलगरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात सहभागी होऊन हातात तिरंगा ध्वज घेऊन विद्यार्थ्यांनी गावातून भव्य अशी रॅली काढली, यावेळी देशभक्तीपर घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. आपल्या ध्वजाचा अधिक सन्मान करण्यासाठी ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ उपक्रमांंतर्गत केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाने ‘हर घर तिरंगा’ या कार्यक्रमाला मान्यता दिली होती. या अंतर्गत सर्व भारतीयांना त्यांच्या घरी १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत राष्ट्रध्वज फडकवण्याचे आवाहन करण्यात आले होते. देशभर हा उपक्रम घराघरात पोहचवण्यासाठी केंद्र व राज्य सरकराने विविध शाळा, महाविद्यालये, संस्थाच्या माध्यमातून जनजागृतीचे कार्यक्रम सुद्धा घेतले होते. म्हणुन १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीमध्ये देशभरात “हर घर तिरंगा’’ म्हणजेच ‘घरो घरी तिरंगा’ हा उपक्रम राबविण्यात आला होता. म्हणून त्याच अनुषंगाने तुळजापूर तालुक्यातील सलगरा (दि.) आणि गंधोरा येथे हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांंतर्गत प्रत्येक शासकीय, निमशासकीय व खाजगी आस्थापनांवर तसेच प्रत्येक घर व इमारतींवर स्वयंस्फूर्तीने राष्ट्रध्वजाची उभारणी करायची होती. राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये या साठी ध्वजसंहितेचे काटेकोरपणे पालन करून या उपक्रमांतर्गत गावातील प्रत्येक नागरीकाने आपल्या घरावर राष्ट्रध्वजाची उभारणी करून ‘हर घर तिरंगा’ अर्थात ‘घरो घरी तिरंगा’ या उपक्रमात भारतीय नागरीक म्हणून सक्रिय सहभाग नोंदवून हा उपक्रम निष्ठेने पार पाडायचा असे आवाहन दोन्ही गावांच्या ग्रामपंचायत कार्यालयाकडून करण्यात आले होते. त्या नुसार शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत विविध ठिकाणी ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणासह घरोघरी तिरंगा फडकवण्यात आला.