Home Blog Page 125

वाचा आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

आज, बुधवार दि. २१ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळ सदस्यांच्या उपस्थितीत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय…

✅भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयात प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करणार; पु.ल. देशपांडे अकादमी मध्ये तात्पुरत्या काळासाठी महाविद्यालयाचे कामकाज २८ सप्टेंबरपासून प्रारंभ होणार. 


✅ राज्य मालमत्ता पुनर्रचना कंपनी स्थापन करणार. त्यामुळे शासनाची जमीन, भागभांडवल, कर्ज, कर्ज हमी याबाबतीतल्या सार्वजनिक हिताचे रक्षण होणार.


✅ पोलीस शिपाई ते पोलीस निरीक्षक यांच्या नैमित्तिक रजा १२ पासून २० इतक्या वाढवल्या 


✅ सफाई कामगारांच्या वारसा हक्काच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन


✅ नाशिक येथील शासकीय अध्यापक विद्यालयाच्या मुलींच्या वसतीगृहाकरिता भाडे तत्त्वावर जागा घेण्याचा निर्णय


✅ वडसा देसाईगंज-गडचिरोली या नवीन रेल्वे मार्गाच्या कामाला वेग देणार. सुधारित खर्चास आणि  राज्य शासनाचा आर्थिक सहभाग देण्यास मान्यता.


✅ बार्शी येथील लक्ष्मी सोपान अॅग्रीकल्चर प्रोड्यूस मार्केटिंग कंपनी या खाजगी बाजार समितीचा कांदा अनुदान योजनेत समावेश


✅ औसा येथे दिवाणी न्यायाधीश न्यायालय स्थापन करून पद निर्मिती करणार


✅ राज्यातील वर्ग-३ मधील लिपिकांची सर्व रिक्त पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरणार


✅ आपत्ती निवारणाच्या विविध प्रकरणांची चर्चा व निर्णय घेण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना


✅ धारावी पुनर्विकासासाठी पुन्हा नव्याने निविदा मागवून तसेच प्रकल्पाला अतिरिक्त सवलती देऊन प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यास मान्यता

दैनिक जनमत २१ सप्टेंबर २०२२ E paper

राज्याचा यंदाचा गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करणार -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई –

राज्याचा यंदाचा गाळप हंगाम दि. १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला. यंदा उसाचे क्षेत्र वाढले असून साखर उत्पादनात महाराष्ट्र जगात तिसरा असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले.

सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कृषीमंत्री अब्दुल सत्तार, बंदरे मंत्री दादाजी  भुसे, सहकार मंत्री अतुल सावे, साखर संघाचे सदस्य व विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार, आमदार बाळासाहेब पाटील, संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, हर्षवर्धन पाटील, प्रकाश आवाडे, श्रीराम शेटे, धनंजय महाडीक आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सादरीकरण केले.

गेल्या हंगामात सुमारे २०० साखर कारखान्यांनी गाळप घेतले असून शेतकऱ्यांना ४२ हजार ६५० कोटी रुपयांची एफआरपी अदा करण्यात आली आहे. राज्याने देशात सर्वाधिक ९८ टक्के एफआरपी अदा केली आहे. या कामगिरीबद्दल साखर आयुक्त शेखर गायकवाड यांचे बैठकीत अभिनंदन करण्यात आले.

यंदाच्या हंगामासाठी उस लागवड सुमारे १४ लाख ८७ हजार हेक्टरवर असून राज्यात ऊस लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. यंदा सरासरी ९५ टन प्रति हेक्टर ऊस उत्पादन अपेक्षित आहे. या हंगामात सुमारे २०३ कारखाने सुरू होणार असून यंदा १३८ लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला. महाराष्ट्राने गेल्या हंगामात १३७.३६ लाख मेट्रीक टन साखर उत्पादन केले असून उत्तर प्रदेशला मागे टाकले आहे.

यंदाचा गाळप हंगाम सरासरी १६० दिवस अपेक्षित असून यंदा गाळप होणाऱ्या ऊसासाठी १०.२५ टक्के बेसिक उताऱ्यासाठी प्रति मेट्रीक टन ३०५० रुपये एफआरपी देण्यात येणार आहे.

देशात सध्या ६० लाख मेट्रीक टन साखरेचा साठा असून महाराष्ट्रात ३० लाख मेट्रीक टन साठा आहे. यंदा देशातून १०० लाख मेट्रीक टन साखर भारतातून निर्यात होण्याचा अंदाज असून त्यात महाराष्ट्राचा वाटा ६० लाख मेट्रीक टन आहे.


इथेनॉल निर्मिती मध्ये देशामध्ये महाराष्ट्राचा वाटा ३५ टक्के आहे. पुढील वर्षी ३२५ कोटी लिटर इथेनॉलची निर्मिती करण्यात येणार असल्याचे सादरीकरणा दरम्यान सांगण्यात आले. साखर निर्यातीबाबत खुला सर्वसाधारण परवान्याबाबत (ओपन जनरल लायसन्स) गेल्या वर्षीचे धोरण कायम ठेवण्याबाबत केंद्र शासनाला पत्र पाठविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. यावेळी उस तोडणीसाठी यांत्रिकीकरणावर भर, सहवीज निर्मिती आदीबाबत चर्चा करण्यात आली.

एकच मिशन, ओबीसी प्रवर्गातून मराठा आरक्षण असा नारा देत गंधोरा ग्रामस्थ एकवटले

सलगरा,दि.१७(प्रतिनिधी)

दि.१९ सप्टेंबर रोजी कळंब येथे होणाऱ्या मराठा क्रांती महामोर्चाच्या अनुषंगाने तुळजापूर तालुक्यातील गंधोरा गावातील समन्वयक समितीकडून व्हॉट्स ॲप ग्रुपच्या माध्यमातून जनजागृती, तरुणांना मार्गदर्शन, बैठकांचे आयोजन, दि.१६ सप्टेंबर रोजी झालेली ग्रामसभा या वरून जोरदार तयारी सुरू असल्याचे दिसून येत आहे. एकच मिशन, ओबीसी प्रवर्गातून मराठा आरक्षण या धोरणावर मराठा समाजाला ओबीसी मधून ५० टक्क्याच्या आत ते पण कायद्याच्या चौकटीतूनच आरक्षणाची मागणी असल्याचे गावातील समन्वयक समितीने सांगितले. समाजाची आर्थिक स्थिती अत्यंत हालाखीची असून मागासलेपणामुळे दिवसेंदिवस मराठा समाजाचे शिक्षणातील प्रमाण घटत आहे. हि बाब सामाजिक न्यायाच्या दृष्टीने गंभीर आहे. त्या अनुषंगाने विदर्भ आणि खानदेशातील कुणबी मराठा, मराठा कुणबी आणि मराठा हे एकच असून कुणबी – मराठा, मराठा कुणबी, यांच्या प्रमाणे मराठा समाजाला ईतर मागास प्रवर्गातून (ओबीसी) ५०% च्या आतील आरक्षण मिळावे या साठीचा ग्रामसभेत ठराव घेण्यात आला. अन् त्या ठरावास सर्वानुमते मंजुरी सुद्धा देण्यात आली. 


मराठा समाजाला आता आरक्षणाची अत्यंत गरज आहे. आणि ते पण ओबीसींच्या ५० टक्के आरक्षणामधूनच मिळावे तेच आरक्षण टिकू शकते. त्या मुळे मराठ्यांच्या हक्काच आरक्षण मिळविण्यासाठी आता पुन्हा एकदा आपली एकी दाखवून येणाऱ्या पिढीसाठी आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी कळंब येथील मोर्चाला जायचं आहे. हा मोर्चा कोणत्याही जाती धर्माविरोधात नाही तर मराठा समाजाला आरक्षण मिळावे या साठी आहे. आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे सर्वात जास्त आत्महत्या या मराठा समजाच्या आहेत. मराठ्यांची बिकट अवस्था झाल्यामुळे आरक्षणाची गरज ओळखून सर्वांनी आपल्या कुटुंबासोबत १९ तारखेच्या महामोर्चात सहभागी होऊन शासनाचे लक्ष वेधून आरक्षणाची मागणी करायची आहे. मोर्चा हा शांततेत – शिस्तीत, पोलीस, समन्वयक, स्वयंसेवक सूचना करतील त्या प्रमाणेच होईल. विशेष म्हणजे या मोर्चाला गालबोट लागू नये या साठी समन्वयक काळजी घेत आहेत. तरी पण जर कोणी गालबोट लावण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल असे समितीने स्पष्ट केले आहे.

मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास तरुण पिढीला माहित असणे गरजेचे ; व्याख्याते भोयटे

 

सलगरा, दि.१४(प्रतिनिधी)

तुळजापूर तालुक्यातील चिकुंद्रा येथील श्री भैरवनाथ माध्यमिक विद्यालय येथे व्याख्याते तथा हिप्परगा येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय भोयटे यांचे व्याख्यान पार पडले. आजच्या युगातील विद्यार्थ्यांमध्ये मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास व स्वामी रामानंद तीर्थ यांच्या विषयी माहिती असणे आजच्या तरुण पिढीला गरजेचे असून आजचा आपला विद्यार्थी मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास विसरत चालला आहे त्यांना हा इतिहास माहीत असायला हवा असे व्याख्याते भोयटे हे बोलताना म्हणाले. स्वामी रामानंद तीर्थ विद्यालय हिप्परगा या विद्यालयाचे मुख्याध्यापक व्याख्याते संजय भोयटे यांच्या व्याख्यानाचे आयोजन चिकुंद्रा येथे करण्यात आले होते. व्याख्याते संजय भोयटे यांच्या या अभ्यासपूर्ण भाषणातून त्यांनी विद्यार्थ्यांना या मुक्तीसंग्रामाचा इतिहास ज्ञात करून दिला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भैरवनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक पी.एस.पवार तर प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे सहशिक्षक कानडे  उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे सहशिक्षक सत्यवान गायकवाड यांनी केले तर प्रास्ताविक भैरवनाथ कानडे यांनी केले आणि आभारप्रदर्शन महादेव गरड यांनी केले.

किरण बकालेंच्या विरोधात जोरदार निदर्शने, मोर्चा काढून निषेध

 

उस्मानाबाद –

जळगाव येथील  पोलीस निरीक्षक किरण बकाले याने मराठा समाजाबद्दल अक्षेपार्ह विधान केल्याबद्दल शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर पोलिस निरीक्षक किरण बकाले यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून मोर्चा काढत   विरोधात घोषणाबाजी केली.

 जळगाव जिल्हा पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण बकाले यांना शासकीय सेवेतून,पोलीस खात्यातून कायमचे बडतर्फ करून, गुन्हा दाखल करून, अटक करून, महाराष्ट्रातून हद्दपार करण्याबाबत शिवराज्याभिषेक सोहळा समिती च्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

या निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्रातील जळगाव जिल्हा येथील जिल्हा पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेचा पोलीस निरीक्षक किरण बकाले यांनी एका पोलीस कर्मचाऱ्या बरोबर मोबाईलवर बोलत असताना मराठा समाजाबद्दल अत्यंत खालच्या पातळीतील हिण,अपमानस्पद, लज्जास्पद, शर्मेने मान खाली घालण्यासारखे बोलून समस्त मराठा समाजाचा व संपूर्ण महाराष्ट्राचा, मराठी माणसांचा अपमान केलेला आहे. पोलीस खात्यासारख्या शिस्तबद्ध खात्यात राहून जात धर्माबद्दल मनात आकस ठेवून वैरभाव, आकस निर्माण करण्याच्या उद्देशाने एका विशिष्ट जात समुदायाचा अपमान करण्याच्या उद्देशाने या पोलीस अधिकाऱ्याने हे वर्तन देशासाठी अशोभनीय आहे. किरण बकाले सारखे अधिकारी जर पोलीस खात्यात राहिले तर समाजात अशांतता निर्माण होऊन समाजात जातीय अशांतता निर्माण होऊ शकते. तरी पोलीस निरीक्षक किरण बकाले व संबंधित पोलीस कर्मचारी याच्यावर महाराष्ट्र शासनाने व पोलीस प्रशासनाने बडतर्फीची कारवाई करावी.तसेच त्यांच्या गुन्हा दाखल करून त्याला अटक करून सदर अधिकाऱ्याला महाराष्ट्रातून हडपार करण्यात यावे असे निवेदनात म्हटले आहे.

या निवेदनावर शिवराज्याभिषेक सोहळा समिती अध्यक्ष शशिकांत खुने, धर्मराज सूर्यवंशी, दत्तात्रय साळुंखे, रवी मुंडे, सदानंद दहीहटणीकर, कंचेश्वर डोंगरे, निशिकांत खोतरे, अमोल पवार, अच्युत थोरात, एडवोकेट प्रशांत, जगदाळे सुनील मिसाळ विकास जाधव गणेश नलवडे आनंद जाधव रियाज शेख धनंजय साळुंखे अशोक गुरव संतोष घोरपडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.