
धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने सर्वाधिक जागा मिळवून सत्तेची बाजू मजबूत केली असली तरी मतांची आकडेवारी पाहता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष अजूनही धाराशिव जिल्ह्यामध्ये जिवंत आणि स्पर्धात्मक राहिला आहे. एकूण मतदान ७,४७,३७० असताना भाजपला १९७,३५९ मतं (२६.४१%) मिळाली, तर शिवसेना उबाठा १७०,४१९ मतं (२२.८०%) मिळाली. यात फक्त ३.६१ टक्के इतकाच फरक आहे – म्हणजे अवघ्या २६,९४० मतांचा!
मतांची आकडेवारी आणि अंतर
भाजप: १९७,३५९ मतं → २६.४१%
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे: १७०,४१९ मतं → २२.८०%
अंतर: भाजप पुढे २६,९४० मतांनी (किंवा ३.६१% ने)
हे अंतर खूप मोठे नाही, विशेषतः जेव्हा जिल्ह्यातील बहुतांश लढत भाजप विरुद्ध शिवसेना उबाठा गट अशीच होती. अनेक जिल्हा परिषद गटांमध्ये दोन्ही पक्षांमध्ये थेट सामना झाला आणि मतविभागणीमुळे भाजपला फायदा झाला. पण मतांची टक्केवारी दाखवते की, उद्धव ठाकरे गटाला ग्रामीण मतदारांची मोठी साथ आहे आणि ते कमी जागा मिळाल्या तरी जनाधार अजूनही मजबूत आहे.
विरोधी पक्षाची ताकद कायम
धाराशिवसारख्या पारंपरिकदृष्ट्या शिवसेना-प्रभावी जिल्ह्यात उद्धव गटाने भाजपला इतक्या जवळून टक्कर दिल्याने विरोधक अजूनही जिवंत असल्याचे स्पष्ट होते. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत शिवसेनेने चांगली कामगिरी दाखवली. महाविकास आघाडीच्या इतर घटकांसोबत (काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट) एकत्र आल्यास महायुतीला धाराशिवमध्ये आव्हान कायम राहू शकते.
इतर पक्षांची स्थिती
शिवसेना (शिंदे गट): १३५,५२५ मतं (१८.१३%)
राष्ट्रवादी (अजित गट): ८३,२१७ मतं (११.१३%)
काँग्रेस: ६२,०३५ मतं (८.३०%)
राष्ट्रवादी (शरद पवार गट): १८,६०५ मतं (२.४९%)
- एमपीएससी विद्यार्थी स्व. प्रथमेश देशमुख यांच्या कुटुंबीयांची आ. रोहित पवार यांच्याकडून सांत्वनपर भेट
- संजय निंबाळकर व भाजपचे नेते रामेश्वर शेटे यांचा आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश; आ.कैलास पाटील यांच्या नेतृत्वात पक्षाची पुन्हा मजबूत बांधणी
- पारगावच्या लॉजवर AHTUचा धडाका!वेश्याव्यवसायावर पोलिसांची थेट कारवाई; परराज्यातील ८ महिलांची सुटका, लॉज मालक-मॅनेजर यांना अटक
- तुळजापुरात सरकारने हिंदुत्व गुंडाळलं, चायनिज कंपनीचे सीसीटीव्ही असलेल्या प्रकल्पाचे उद्या पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
- पवनचक्कीचे साहित्य चोरणारी सराईत टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात