धाराशिव: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-Kisan) योजनेच्या नावाने शेतकऱ्यांना बनावट PM Kisan List APK किंवा PM Kisan APK लिंक पाठवून फसवणुकीचे प्रकार समोर येत आहेत. या लिंकवर क्लिक करताच शेतकऱ्यांच्या बँक खात्यातील रक्कम गायब होत असल्याच्या अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत.
शासन निर्णय क्र.- किसनि २०२३/प्र.क्र. ४२/११-अ दिनांक १५ जून २०२३ अन्वये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना कृषि विभागामार्फत राबविली जाते. मात्र, सायबर गुन्हेगारांनी या योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांना बनावट लिंक पाठवून त्यांची फसवणूक सुरू केली आहे.
शेतकऱ्यांनी घ्यावयाची खबरदारी:
- PM Kisan List APK किंवा PM Kisan APK नावाच्या कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये.
- अधिकृत माहितीसाठी फक्त PM Kisan च्या अधिकृत वेबसाईटवर (https://pmkisan.gov.in/) भेट द्यावी.
- अशा फसवणुकीस त्वरित सायबर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी.
या संदर्भात जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, धाराशिव श्री. रविंद्र माने यांनी शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.