Home ताज्या बातम्या श्री. तुळजाभवानी सैनिकी विद्यालय हे CBSE दर्जा प्राप्त करणारे राज्यातील पहिले विद्यालय

श्री. तुळजाभवानी सैनिकी विद्यालय हे CBSE दर्जा प्राप्त करणारे राज्यातील पहिले विद्यालय

0
31

धाराशिव :- श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर संचलित श्री तुळजाभवानी सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयास केंद्रीय शिक्षा माध्यमिक बोर्ड, नवी दिल्ली यांनी अभ्यासक्रम चालू करण्यास परवानगी दिली आहे. जिल्हाधिकारी यांचा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च प्रतिचे शिक्षण मिळावे असा मानस होता. त्यासाठी त्यांनी स्वतः राज्य व केंद्र पातळीवरती विशेष प्रयत्न केल्याने CBSE बोर्डाची मान्यता मिळालेली आहे. राज्य शासनाच्या अनुदानित शाळेस CBSE अभ्यासक्रम चालू करणारी महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा ठरली आहे.

महाराष्ट्रातील सैनिकी विद्यालयातील जास्तीत जास्त विद्यार्थी सैन्य दलात दाखल व्हावेत व देशसेवा करावी, या उद्देशाने सन 1996 पासून सैनिकी शाळा सुरु झाल्या. तेव्हा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान या संस्थेस महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा सुरु करण्याचा मान मिळाला होता. परंतु सदरील सैनिकी शाळामध्ये राज्य शासनाचा अभ्यासक्रम चालू असल्याने सैन्य दलामध्ये समाविष्ट होण्याचे प्रमाण कमी असल्याने डॉ.सचिन ओम्बासे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर यांनी श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालयात CBSE अभ्यासक्रम चालू करण्याचा निर्णय घेतला व विद्यालयामार्फत CBSE अभ्यासक्रम चालू करण्याकरीतेची प्रक्रिया सप्टेंबर 2023 पासून सुरु करण्यात आली. या मध्ये विद्यालयाने सर्व बाबींची पूर्तता केल्याने CBSE बोर्डाकडुन (दि.19ऑगस्ट) रोजी विद्यालयास मान्यता मिळाली आहे.

जिल्हाधिकारी यांचा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च प्रतिचे शिक्षण मिळावे असा मानस होता. त्यासाठी त्यांनी स्वतः राज्य व केंद्र पातळीवरती विशेष प्रयत्न केल्याने CBSE बोर्डाची मान्यता मिळालेली आहे.

या साठी डॉ.सचिन ओम्बासे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष श्री.तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर यांचे फेटा बांधुन पुस्तक देऊन विद्यालयाचे प्राचार्य वैजनाथ घोडके यांनी सत्कार केला. त्याचबरोबर अरविंद बोळंगे तहसिलदार तथा विश्वस्त, श्रीमती माया माने तहसिलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर यांचाही पुस्तक भेट देवून सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी जिल्हाधिकारी ओम्बासे यांनी विद्यालयातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे CBSE अभ्यासक्रम सुरु झाल्याबद्दल अभिनंदन करुन मार्गदर्शन केले. CBSE अभ्यासक्रमाच्या प्रक्रियेमध्ये प्राध्यापक गणेश मोटे अभियांत्रिकी महाविद्यालय, व विद्यालयातील सहशिक्षक श्रीनिवास कदम, संगणक निदेशक श्रीमती ज्योती नाशे यांचा पुष्पगुच्छ देवुन जिल्हाधिकारी यांनी अभिनंदन केले. तसेच जिल्हाधिकारी महोदयांनी विद्यालयाचे प्राचार्यांना पेढा भरवुन विशेष अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या व त्याचबरोबर विद्यालयातील विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली व समाधान व्यक्त केले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here