दोन हजाराची लाच स्वीकारली कंत्राटी लिपिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

0
50

धाराशिव – अडीच हजाराची लाच मागणी करून दोन हजार स्वीकारल्याने परांडा पंचायत समितीतील विकास विजयकुमार बनसोडे, वय-35 वर्षे, क्लर्क कम डाटा एन्ट्री ऑपरेटर (कंत्राटी) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे.
तक्रारदार यांचे भावाचे नावे महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत मौजे सोनारी येथे शेत गट नंबर 92 मध्ये लागवड केलेल्या केळी या फळबागेचे 39,852/- रुपयाचे कुशल बिल ऑनलाईन अपलोड करण्यासाठी व तक्रारदार यांचे पुढील महिन्यात निघणारे दोन मस्टरचे बिल ऑनलाईन अपलोड करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे 2500/-रुपये लाचेची मागणी करून तडजोडअंती 2000/-रुपये लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य करून 2000/- हजार रुपये लाच रक्कम पंचा समक्ष स्वतः स्विकारली असता आलोसे यास ताब्यात घेण्यात आले असून पोलीस ठाणे परंडा येथे गुन्हा दाखल करण्याची पुढील प्रक्रिया सुरू आहे.
सापळा अधिकारी म्हणून विकास राठोड पोलीस निरीक्षक यांनी काम पाहिले तर सापळा पथकात
पोलीस अमलदार इप्तिकार शेख, मधुकर जाधव, विशाल डोके, चालक -दत्तात्रेय करडे यांचा समावेश होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here