कुलस्वामिनी नॅचरल शुगर्स प्रा.लि. चे मिल रोलर पुजन उत्साहात संपन्न
धाराशिव-
धाराशिव तालुक्यातील बेंबळी येथील कुलस्वामिनी नॅचरल शुगर्स चे गळीत हंगाम 2024-25 साठीचे मिल रोलर पुजन कारखान्याचे संस्थापक धाराशिवचे माजी नगराध्यक्ष श्री. मधुकररावजी तावडे, चेअरमन आकाश मधुकरराव तावडे यांच्या हस्ते कारखाना कार्यस्थळावर संपन्न झाले.
या कार्यक्रमास जनरल मॅनेजर शरद गुंड, चिफ इंजिनीयर साळुंके, चिफ केमिस्ट मोळे, मुख्य शेतकी अधिकारी तवले, चिफ अकौंटंट तौर, राजाभाऊ गुंड व इतर कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना संस्थापक मधुकरराव तावडे यांनी यंदाच्या हंगामात दिड लाख में टन गाळपाचे उद्दिष्ट असल्याचे सांगीतले, यासाठी तोडणी वाहतुक यंत्रणा सज्ज असुन यंत्र सामग्रीच्या दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण करुन कारखाना आक्टोंबर महिन्यात चालु करण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी सहकार्य करण्याचे अवाहन यावेळी केले.