back to top
Saturday, September 14, 2024
Google search engine
Homeधाराशिवदोन धर्मात जाणूनबुजून तेढ निर्माण करणार्‍या रामगिरी महाराजावर गुन्हा दाखल करा

दोन धर्मात जाणूनबुजून तेढ निर्माण करणार्‍या रामगिरी महाराजावर गुन्हा दाखल करा

धाराशिव येथील मुस्लिम समाजाचे जिल्हा पोलीस अधीक्षक, शहर पोलीस निरीक्षकांना निवेदन

धाराशिव-

दोन धर्मात जाणूनबुजून तेढ निर्माण करणारे प्रवचन देऊन धार्मिक कलह पसरविण्याचा प्रयत्न करणारे रामगिरी गुरु नारायण महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करुन तातडीने अटक करावी, अशी मागणी मुस्लिम समाजाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक आणि शहर पोलीस निरीक्षकांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, सरला बेट येथील रामगिरी गुरु नारायण गिरी महाराज यांनी पंचाळे (ता.सिन्नर, जि.नाशिक) येथे सप्ताहादरम्यान प्रवचनामध्ये उपस्थित जनसमुदायासमोर मुस्लिम धर्माची व धर्मगुरुची प्रतिमा मलिन होईल असे वक्तव्य केले. भारतात एक कोटीपेक्षा अधिक मुस्लिमांनी इस्लाम सोडला आहे. दहा-वीस वर्षे ज्यांनी मौलाना म्हणून काम केलेे आहे त्यांनी इस्लामचा सूक्ष्म अभ्यास केला असता त्यांना यात अन्याय-अत्याचाराशिववाय काहीही आढळून न आल्यामुळे त्यांनी इस्लाम धर्म सोडून दिला आहे. मोहम्मद पैगंबर यांनी वयाच्या पन्नासाव्या वर्षी सहा वर्षाच्या मुलीसोबत विवाह केला. ज्यांचे आदर्शच अत्याचारी आहेत, त्यांच्याबाबत अजून काय सांगायचे? अशा शब्दात त्या प्रवचनामध्ये मुस्लिम धर्मीयांबाबत मोठ्या प्रमाणावर अनेक वक्तव्ये रामगिरी गुरु नारायण महाराज यांनी केली आहेत. या वक्तव्यामुळे हिंदू-मुस्लिम समाजाची मने कलुषित करुन जातीय तणाव व धार्मिक द्वेष पसरविण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक करण्यात आला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांची पाठराखण केलेली आहे. त्यामुळे समस्येचे गांभीर्य ओळखून रामगिरी महाराज यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करुन त्यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. 

निवेदनावर मसूद शेख, खलील सय्यद, कलीम कुरेशी, मौलाना जाफरअली खान, सय्यद नादेरुल्लाह हूसेनी, कफिल सय्यद, मुजीब काझी, वाजीद पठाण, मैनोद्दीन पठाण मौलाना इस्माईल खारी, मोहम्मद इर्शाद कुरेशी, शहानवाज सय्यद, मोहम्मद खान, शेख हाफीज अख्तर  मोहंमद झुलखरनैन, मुख्तार शेख, बिलाल रजवी, इस्माईल काझी, अजीज शेख, रिजवान रजा, बिलाल रजा, हाफीज असलम, हाफीज अस्लम शब्बीर,हाफिज तौफिक पठाण,एजाज काझी ,मौलाना अफजल निजामी, गफार शेख, इरशाद बरकाती, मुस्तफा खान, निहाल शेख, जमीर शेख, ईश्तीयाक कुरेशी जमीर पठाण , अझीझ शेख व इतर मुस्लिम बांधवांची स्वाक्षरी आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments