back to top
Saturday, September 14, 2024
Google search engine
Homeताज्या बातम्याआर्थिक ताळेबंद दर्शवणारा माहिती फलक

आर्थिक ताळेबंद दर्शवणारा माहिती फलक

विश्वासाहर्ता, पारदर्शकतेसाठी
श्री सिध्दीविनायक परिवाराचा अभिनव उपक्रम

धाराशिव – श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट को.ऑप. क्रेडीट सोसायटी लि. धाराशिव संस्थेच्या दैनंदिन आर्थिक माहितीच्या माहिती फलक उदघाटन मा. आ. सुजितसिंह ठाकुर सो. यांच्या हस्ते संपन्न झाले.
दि. १४ ऑगस्ट रोजी धाराशिव येथील श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट सोसायटीच्या मुख्य शाखा येथे संस्थेच्या दैनंदिन आर्थिक ताळेबंद दर्शवनारी माहिती फलक चे उदघाटन मा.आ.सुजितसिंह ठाकुर साहेब यांच्या शुभहस्ते व सहाय्यक निबंधक सहकारी संस्था धनाजी काळे, तसेच सहकार अधिकारी बालाजी सावतर, सहकार बोर्ड मधुकर जाधव साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाले.
श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट मागील दशकांपासून धाराशिवकरांच्या विश्वासास पात्र ठरलेली संस्था असून २६००० पेक्षा जास्त खातेदारांनी या संस्थेच्या माध्यमातून आपले समाधानी आर्थिक व्यवहार केलेले आहेत.
संस्थेने आपल्या सर्व सभासद, खातेदार, ठेवीदार यांना आपली दैनंदिन आर्थिक स्थिती माहिती करून देण्यासाठी एक अभिनव उपक्रमाद्वारे दैनंदिन आर्थिक माहितीचा फलक संस्थेच्या मुख्य कार्यालयाच्या बाहेर लाऊन एक आदर्श पारदर्शक व्यवहाराचा पायंडा निर्माण केला आहे. असे मा.श्री. सुजितसिंह ठाकुर साहेब यावेळी म्हणाले.
श्री सिध्दीविनायक पारिवारची समाजातील विश्वासाहर्ता पारदर्शकता व नाविन्यपूर्ण उपक्रम या संपूर्ण परिवारासाठीच्या महत्वाच्या बाबी आहेत असे धनाजी काळे यावेळी म्हणाले.
या कौतुकास्पद उपक्रमाचे स्वागत संस्थेच्या सर्व ठेवीदार सभासदांच्या माध्यमातून होत आहे. यावेळी संस्थेचे संस्थापक दत्ताभाऊ कुलकर्णी, राजेश जाधव, प्रतिक देवळे, दिनेश कुलकर्णी, गणेश कामटे, अॅड. नितीन भोसले, अरविंद गोरे, जहीर चौधरी, किशोर तिवारी, देविदास कुलकर्णी, नितीन हुंबे,लक्ष्मण शिंदे, प्रशांत वाघमारे, योगेश कुलकर्णी, रणजित भोरे,नितीन भोसले, व सर्व कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments