Home ताज्या बातम्या घरकुलासाठी २ हजाराची लाच स्वीकारून ३ हजाराची मागणी, ग्रामसेवकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची...

घरकुलासाठी २ हजाराची लाच स्वीकारून ३ हजाराची मागणी, ग्रामसेवकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

0
56

धाराशिव – घरकुलासाठी २ हजाराची लाच स्वीकारून ३ हजाराची मागणी केल्याने ग्रामसेवकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली असून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सुभाष सिद्राम चौगुले वय 54 वर्ष पद- ग्रामसेवक, मौजे वडगाव (काटी) ता.तुळजापूर जि. धाराशिव.तुळजापूर रा. बीबी दारफळ ता. उत्तर सोलापूर जि.सोलापूर. यांनी 

तक्रारदार यांना शासनाकडून घरकुल मिळणेसाठीचा प्रस्ताव पंचायत समिती कार्यालय, तुळजापूर येथे पाठवण्यासाठी यातील आलोसे यांनी लाच मागणी पडताळणी दरम्यान पंचा समक्ष यापूर्वी 2000/- रुपये स्वीकारल्याचे मान्य करून आणखी 3000/- रुपये  लाचेची मागणी करुन स्विकारण्याची तयारी दर्शविली यावरून आलोसे यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन तुळजापूर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.

सापळा अधिकारी म्हणून – नानासाहेब कदम, पोलिस निरीक्षक यांनी तर सापळा पथकात 

पोलीस अंमलदार-आशिष पाटील, सिद्धेश्वर तावसकर यांनी काम पाहिले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here