नळदुर्ग :- उमरग्याहुन सोलापुरकडे जाणाऱ्या स्कार्पिओ गाडीतुन 1 कोटी 5 लाख 78 हजार 800 रुपयाचा गांजा नळदुर्ग येथील राजा बागसवार दर्गाहसमोर राष्ट्रीय महामार्गवर नळदुर्ग पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडला आहे. नळदुर्ग पोलिसांच्या या कारवाईचे सर्व स्तरातुन स्वागत होत आहे.
सोलापुर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गवरून नेहमीच गांजासाह गुटख्याची कायम तस्करी सुरु असते. 30 जुलै रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास नळदुर्ग पोलिसांची रात्री राष्ट्रीय महामार्गवर गस्त सुरु होती यावेळी उमरग्याहुन सोलापुरकडे भरधाव वेगात स्कार्पिओ गाडी क्र. एम. एच. 08 झेड 5684 ही जात असताना पोलिसांना संशय आल्याने त्यांनी नळदुर्ग येथील राष्ट्रीय महामार्गवर ही गाडी अडविली. गाडी थांबल्यानंतर गाडीची तपासणी केल्यानंतर गाडीत मोठ्या प्रमाणात गांजा आढळून आला. यावेळी अतिष राजकुमार माने याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर हा गांजा आपण सोलापुरला घेऊन जात असल्याचे सांगितले. त्यांचबरोबर त्याच्याकडे चौकशी केले असता यामध्ये भीमराव दिलीप खडसुळे, राम दिलीप खडसुळे, डी. जे. चहाविक्रेता, कळवे, रवी सर्व रा. सोलापुर व राहुल रा. अहमदनगर हे यामध्ये सहभागी असल्याचे निष्पन्न झाले.या सर्व आरोपीवर नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या फिर्यादीवरून नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन यातील अतिष राजकुमार माने याला अटक करण्यात आली आहे. स्कार्पिओ गाडीतुन पोलिसांनी एकुण 528 किलो गांजा जप्त केला आहे त्याची किमत 1 कोटी 5 लाख 78 हजार 800 रुपये इतकी किमत आहे. गांजा व स्काकर्पिओ गाडी असा एकुण 1 कोटी 15 लाख 78 हजार 800 रु्पयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अलीकडच्या काळात राष्ट्रीय महामार्गवर इतक्या मोठ्या किमतीचा गांजा पकडण्याची ही पहिलीच वेळ आहे.याबाबतचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक आनंद कांगुने हे करीत आहेत.सदरील कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक गोहर हसन, तुळजापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश देशमुख मार्गदर्शनाखाली नळदुर्ग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गजेंद्र सरोदे, सहाय्यक पोलिस निरीक्षक आनंद कांगुने, सुरज देवकर,विजय आटोळे, पोलिस उपनिरीक्षक ईश्वर नांगरे,संतोष गिते, विजय थोटे, पोलीस हेड कॉन्स्टेबल उमाजी गायकवाड, सुरेश सगर, अमर जाधव, सूर्यकुमार फुलसुंदर, बालाजी शिंदे ,दत्ता हिंगे, दत्ता कुंभार, शंकर कांबळे यांच्यासह इत्यादी पोलिस कर्मचाऱ्यांनी केली आहे.पोलिसांच्या या कारवाईचे सर्वस्तरातुन स्वागत होत आहे.
- तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये जिजाऊ गुरुकुल चा दबदबा
- आरोग्यमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या संकल्पनेतून महिलांसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रम उत्सहात संपन्न
- भैरवनाथ उद्योग समुहाच्या वतीने वाकडी येथे शेत रस्ता कामास प्रारंभ
- परंडा येथे खेळ पैठणीचा सन्मान नारी शक्तीचा कार्यक्रमाचे आयोजन
- एस. टी. कर्मचाऱ्यांचे आंदोलन, बस सेवेबाबत संभ्रम