Home ताज्या बातम्या धाराशिव जिल्हा परिषदेत मुख्यमंत्री युवाकार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत काम करण्याची संधी, विद्यावेतन मिळणार,...

धाराशिव जिल्हा परिषदेत मुख्यमंत्री युवाकार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत काम करण्याची संधी, विद्यावेतन मिळणार, अर्ज करण्याचे आवाहन

0
99

धाराशिव

मुख्यमंत्री युवाकार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत आज दिनांक. ३०.०७.२०२४ रोजी शासन निर्णयातील तरतुदीप्रमाणे जिल्हा परिषद धाराशिव अंतर्गत शासकीय आस्थपनेमधील मंजुर पदाच्या ५ टक्के इतके उमेदवार कार्यप्रशिक्षणासाठी घेण्यासाठी कौशल्य विकास विभागाच्या संकेतस्थळावर लिंक प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यामध्ये पशुसंवर्धन विभागा अंतर्गत पशुधन पर्यवेक्षक पदे ११, डाटा एन्ट्री ऑपरेटर १, परिचर ४, शिक्षण प्राथमिक विभागा अंतर्गत शिक्षक पदवीधर १००, प्राथमिक शिक्षक १५३, परिचर २०, कृषी विभागा अंतर्गत कृषी पदविका २, डाटा एन्ट्री ऑपरेटर १, ग्रामीण पाणी पुरवठा विभागा अंतर्गत अभियंता २, कनिष्ठ सहाय्यक ४, ऑपरेटर १, परिचर १, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व एम.एस.आर.एल.एम. अंतर्गत शिपाई ३, डाटा एन्ट्री ऑपरेटर ३, पंचायत विभागा अंतर्गत ग्रामसेवक २६, ग्रामपंचायत कर्मचारी ५०, सामान्य प्रशासन विभागा अंतर्गत परिचर १०, पाणी व स्वच्छता विभागा अंतर्गत अभियंता १, बी आर.सी.२, आरोग्य विभागा अंतर्गत ए.एन.एम. २४, जे.ए.एन.एम.१०, परिचर ५०, महिला बालकल्याण विभागा अंतर्गत डाटाएन्ट्री ऑपरेटर ६, वित्त विभाग ५ पदे, समाजकल्याण विभाग १ शिक्षण माध्यमिक १, बांधकाम विभागा अंतर्गत ८ पदे, जिल्हा जलसंधरण विभागा अंतर्गत ५ पदे, वरिलप्रमाणे पदभरतीसाठी लिंक प्रसिध्द करण्यात आली आहे.

सदर कार्य प्रशिक्षणाचा कालावधी ६ महिने असेल, प्रशिक्षणार्थीला शैक्षणिक अर्हतेप्रमाणे १२ वी पास रुपये ६०००/- आयटीआय / पदवीका रुपये ८०००/-, पदविधर/पदव्युत्तर रुपये १००००/- प्रतिमाह विद्यावेतन दिले जाईल.

या कामास श्री. गुरव सर कौशल्य विकास अधिकारी यांनी मार्गदर्शन केले. युवकांना / उमेदवारांना कौशल्य विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in/admin
या वेबसाईटवर अर्ज दाखल करण्यासाठी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद धाराशिव यांच्या कडुन आवाहन करण्यात येत आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here