धाराशिव दि.३० (प्रतिनिधी) – येथील अभिनव इंग्लिश स्कूलमध्ये गरीब विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला आहे. २५ टक्के प्रवेश न देता शिक्षणाचा मूलभूत अधिकार कायदा २००९ चे उल्लंघन केले आहे. त्यामुळे संबंधित शाळेवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पालकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, धाराशिव येथील अभिनव इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षणाचा मूलभूत अधिकार कायद्यानुसार गरीब घटकांतील २५ टक्के विद्यार्थ्यांना प्रवेश देणे बंधनकारक आहे. मात्र या स्कूलने या कायद्याचे उल्लंघन करून गरीब विद्यार्थ्यांना हक्काच्या शिक्षणापासून वंचित ठेवले आहे. विशेष म्हणजे आरटीई अंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२४ साठी संबंधित विद्यार्थ्यांनी शासकीय नियमानुसार अर्ज दाखल केले होते. मात्र या स्कूलने आरटीई नियमांचे सरळ सरळ उल्लंघन करून गरीब विद्यार्थ्यांना हक्काच्या शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे कारस्थान केले आहे. त्यामुळे २५ टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. या निवेदनावर जलालोद्दीन शेख, प्रभाकर देशपांडे, समीर रजवी, नवनाथ गुरमे, आसिफ तांबोळी व राजू शेख यांच्या सह्या आहेत.
- तासगावचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष गुलाबराव काका पाटील यांचे दुःखद निधन
- शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांचा पुन्हा एल्गार
- बर्ड फ्लू बाबत धाराशिव जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभाग सतर्क
- क्रेन च्या साहाय्याने भलमोठा पुष्पहार घालत संजय गाढवे यांचा वाढदिवस साजरा
- बंदुक परवाना मिळवण्यासाठी सरपंचाने केला स्वतःचे गाडीवर हल्ला करण्याचा बनाव