धाराशिव –
मराठा सेवा संघाची जिल्हा कार्यकारणी नुकतीच जाहीर झाली असून जिल्हाध्यक्षपदी महेश भगत यांची निवड करण्यात आली.
मराठा सेवा संघाची प्रमुख पदाधिकारी ज्येष्ठ सदस्यांच्या उपस्थित बैठक पार पडली. यावेळी जेष्ठ मार्गदर्शक नेताजी गोरे,प्रदेश उपाध्यक्ष संदिपान जाधव,माजी जिल्हाध्यक्ष डी आर कदम,विभागाचे अध्यक्ष ठाकरे साहेब,इंजी राजकुमार भुतेकर, माजी जिल्हाध्यक्ष तुषार पाटील ॲड. तानाजी चौधरी, बलराज रणदिवे, रोहित पडवळ, अतुल गायकवाड,प्रशांत शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाध्यक्ष पदी महेश चंद्रकांत भगत, विभागीय कार्याध्यक्ष पदी सतीशकुमार पाटील,विजयकुमार शिवाजीराव पवार यांची जिल्हा कार्याध्यक्ष,रोहीत हरिदास यादव यांची जिल्हा उपाध्यक्ष तर महेश इंगळे यांची शहरप्रमुख पदी निवड करण्यात आली.यावेळी इंजि. प्रदीप धस, इंजि. दंडनाईक, अजय माने, हनुमंत हुंबे, महादेव सावंत, अजय भोसले, जावेद सौदागर, पी एन देशमुख, विजयसिंह देशमुख इत्यादी उपस्थित होते
बैठकीत मराठा सेवा संघाची कार्यपध्दती भविष्य काळात काम करण्याचे नियोजन समजावून सांगण्यात आले.सेवा संघाची विचारधारा तळागाळापर्यंत रुजवण्यासाठी ताकदीने काम करण्याचे उपस्थितांनी सांगितले.