Home ताज्या बातम्या वेळेत ब्लाऊज शिवून दिले नाहीत, धाराशिव येथील मैत्रिण टेलर्स अँड बुटीकला जिल्हा...

वेळेत ब्लाऊज शिवून दिले नाहीत, धाराशिव येथील मैत्रिण टेलर्स अँड बुटीकला जिल्हा ग्राहक तकार निवारण आयोगाचा दणका

0
41

धाराशिव (प्रतिनिधी) धाराशिव शहरातील कोकाटे कॉम्पलेक्स, बालाजी मंदीर रोड परीसरातील नामवंत अशा मैत्रिण टेलर्सच्या पोपायटर सौ नेहा संत यांना धाराशिव जिल्हा ग्राहक तकार निवारण आयोगाने त्यांनी ग्राहकास वेळेत ब्लाऊज शिवुन दिले नाही म्हणुन ग्राहकास कोणतीही शिलाईची रक्कम न घेता निकाल तारखेपासुन १५ दिवसाचे आत दुसरा ब्लाऊज शिवुन दयावा, तसेच मानसिक, शारीरीक त्रासापोटी १०,000 रू. व अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रू.५,००० रू. दयावे असा आदेश दिला.

याबाबत थोडक्यात हकिकत अशी की, धाराशिव येथील सी. स्वाती प्रशांत कस्तुरे यांनी दिनांक १३.०१.२०२३ रोजी मैत्रिण टेलर्स अॅन्ड वुटीक या लेडीज टेलरकडे २ पुर्ण वर्कचे ब्लाऊज शिवण्यासाठी टाकले होते, व त्याबाबत असलेली शिलाईची एकुण रक्कम रू.६,३०० पैकी अॅडव्हान्स म्हणुन ३००० रू. दिलेले होते, व दोन्हीही व्लाऊज मिळण्याची तारीख २५.०१.२०२३ अशी होती, परंतु संबंधीत मैत्रिण टेलर्सच्या संचालिका नेहा संत यांनी वारंवार सदरचे दोन्ही ब्लाऊज शिवुन देण्याचे टाळले, तसेच त्याबाबत वारंवार विचारणा केल्यावर व्लाऊजची डिलिव्हरी देण्यास टाळाटाळ केली, त्यामुळे शेवटी सौ. स्वाती प्रशांत कस्तुरे यांनी अॅड. प्रशांत कस्तुरे यांच्या मार्फत नोटीस पाठवली परंतु मैत्रिण टेलर्स यांनी नोटीस घेण्यास इन्कार केला, म्हणुन सौ. स्वाती प्रशांत कस्तुरे यांनी अॅड प्रशांत कस्तुरे यांच्या मार्फत धाराशिव येथील जिल्हा ग्राहक तकार निवारण आयोगाकडे तकार दाखल केली, यामध्ये तकारीची सत्यता पडताळुन जिल्हा ग्राहक तकार निवारण आयोगाचे अध्यक्ष श्री. किशोर डी. वडणे व सदस्य श्रीमती वैशाली म. वोराडे यांनी मैत्रिण टेलर्सच्या प्रोप्रायटर सौ. नेहा संत यांनी तकारकर्ती यांना कोणतीही शिलाईची रक्कम न घेता निकाल तारखेपासुन १५ दिवसाचे आत दुसरा ब्लाऊज शिवुन दयावा, तसेच मानसिक, शारीरीक आसापोटी १०,००० रू. व अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रू.५,००० रू. दयावे असा आदेश दिला.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here