धाराशिव जिल्ह्यातील सरपंच पदाचे आरक्षण निश्चित 31 जुलै रोजी आरक्षण सोडत

0
463

धाराशिव दि.30,(प्रतिनिधी):-सन 2024 ते सन 2025 या कालावधीत होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.तालुकानिहाय जिल्हयातील सरपंच पदे नागरिकांचा मागास प्रवर्ग,खुला प्रवर्गासाठी अधिसूचित करण्यात आली आहे.
महाराष्ट्र ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) नियम 1964 मधील नियम 4 अन्वये महिलांचे आरक्षण जिल्हाधिकारी हे करणार आहे. जिल्हाधिकारी यांचे याबाबतचे अधिकार तहसिलदार यांना देण्यात आले आहे.तहसिलदार यांची यासाठी प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.सरपंच पदाचे आरक्षण निश्चित केल्याने 31 जुलै रोजी सरपंच पदाची आरक्षण सोडत दुपारी 12 वाजता काढण्यात येणार आहे.
तहसिलदार तुळजापूर,उमरगा, लोहारा,कळंब,वाशी व भूम हे त्यांच्या तालुक्यातील सरपंच पदाच्या आरक्षणाची आणि जिल्हाधिकारी यांच्यावतीने महिला सरपंचाचे आरक्षण काढण्याची कार्यवाही करतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here