उस्मानाबाद- भगव्याच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना माफ करू नका त्यांना त्यांची जागा दाखवा असे आवाहन शिवसेनाप्रमुख उदधव ठाकरे यांनी उस्मानाबाद येथील सभेत करत पक्ष सोडून जनाऱ्यांवर टीका केली
शिवसेनेचे उमेदवार कैलास पाटील यांच्या प्रचारासाठी ठाकरे उस्मानाबाद येथे आले होते. १० रुपयात थाळी, १ रुपयात आरोग्य तपासणी, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, महाविद्यालयीन तरुणींना मोफत शिक्षण व बससेवा हा शिवसेनेचा वचननामा जनतेपुढे मांडला. तसेच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि अजित पवार यांच्यावरही खरपूस टीका केली.
सभेसाठी परीक्षेची वेळ बदलली
उध्दव ठाकरे यांची सभा जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या प्रांगणात झाली मात्र तत्पूर्वी शाळेत चालू असलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेची वेळ बदलली, तसेच सभा होत असलेल्या परिसरात इतर शाळा व महविद्यालयाच्या परीक्षा चालू असल्याने याचा त्रास विद्यार्थ्यांना झाल्याने पालकांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळाला.