back to top
Friday, November 22, 2024
Google search engine
Homeसंपादकीयअग्रलेख - धन'नाशक'

अग्रलेख – धन’नाशक’

धन’नाशक

शेतकऱ्याने पोटच्या लेकराप्रमाणे जपलेल्या पिकाला हानिकारक ठरते ते तण आणि ते तण काढण्यासाठी वापरात येणारे तणनाशक शेतकऱ्यांसाठी परत हानिकारक ठरत आहे.   पिकांवरील कीटकांनाही जगण्याचा हक्क. एव्हाना कीटक अन्नसाखळीचा घटक आहेत. तो आपला जीव वाचवण्यासाठी शेतकऱ्याने फवारलेल्या कीटकनाशकांना पचवण्याची क्षमता (रेजिस्टन्स) विकसित करतो. यातूनच जहाल कीटकनाशकांच्या वापराचे दुष्टचक्र भारतीय शेतीत उभे झाले अन् शेतीवर विसंबून असलेल्या शेतकरी, मजुरांच्या आरोग्याचे प्रश्र बिकट झाले आहेत.
इन्सेक्टिसाइड अॅक्ट १९६८ हा कायदा कीटकनाशक नियंत्रणासाठी भारतात अस्तित्वात आला तेव्हा देशात २० कीटकनाशक उत्पादक कंपन्या होत्या. सध्याच्या घडीला भारतात ३५
हजार कोटींची उलाढाल करणान्या ३१२ कीटकनाशक कंपन्या आहेत. कीटकनाशकाच्या फवारणीतून मानवाच्या लैंगिक
क्षमतेवरच भयावह परिणाम होत असल्याची बाब
निदर्शनास आली आहे.  ग्लायफोसेट, मोनोक्रोटोफॉस यासारख्या जहाल विषांच्या प्रभावातून बहुसंख्य शेतकऱ्यांमध्ये नपुंसकत्व येत असल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे. इतकेच नव्हे
तर नवजात बालकात शारीरिक व बौद्धिक व्यंगत्व तसेच कर्करोग, हृदयरोग, अॅनिमिया अशा आजारांची मालिकाच या फवारणीमुळे सुरू होत असल्याचा निष्कर्ष ‘पेस्टीसाइड अॅक्शन नेटवर्क ऑफ इंडियाचे’ हैद्राबाद येथील संशोधक डॉ. नरसिंव्हा रेड्डी यांनी काढले आहेत.कीटकनाशकांचे परिणाम मानवी
मेंदूवर होत असल्याने सुरुवातीला थकवा
येतो. त्यानंतर शरीराच्या रक्तवाहिन्या
कमकुवत पडू लागतात. 
२००० ते २०१५ या कालावधीत एकट्या महाराष्ट्रातील कीटकनाशकांचा वापर तीन हजार २३९ टनांवरून ११हजार ६६५ टनांपर्यंत पोहोचल्याची
थकादायक माहिती पुढे आली. शेतकऱ्यांचा 
कीटकनाशक वापराबाबत पूर्ण विश्वास कृषी केंद्रचालकांवर आहे. त्यातून हव्या त्या प्रकारची घातक कीटकनाशके शेतकऱ्यांच्या माथी मारली जातात.याला पर्याय उरतो केवळ सेंद्रिय शेतीचा मात्र सेंद्रिय शेतीकडे शेतकरी वळत नाहीत. सरकारकडून त्यांना वळवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात नाहीत. सेंद्रिय कीटक नाशक प्रभाव लवकर दाखवत नसल्याने शेतकरी त्याचा वापर करत नाहीत. पंजाब आणि हरियाणा सारख्या शेतीमध्ये प्रगत समजल्या जाणाऱ्या राज्यात कीटनाशकांचा अतिवापर केल्याने अनेक जण कर्करोगाला बळी पडले आहेत. पंजाब मधून बिकानेर राजस्थान मध्ये एक रेल्वे ला कॅन्सर ट्रेन म्हणून ओळखले जाते. या रेल्वे मधून शेकडो कॅन्सरग्रस्त उपचारासाठी प्रवास करतात. आस्मानी आणि सुलतानी संकटांचा सामना शेतकऱ्यांना नेहमी करावा लागतो भविष्यात कीटकनाशक आणि तणनाशक यांच्या वापरामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागेल आणि हे शेतकऱ्यांसाठी धननाशक असेल
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments