उस्मानाबाद नगरपालिका मुख्याधिकार्यांचा भोंगळ कारभार !
उस्मानाबाद/प्रतिनिधी
उस्मानाबाद नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी कामकाजात कुचराई केल्यामुळे त्यांकडे लोकशाही दिनातील एकुण १८ प्रकरणे प्रलंबित आहेत. याबाबत जिल्हाधिकार्यालयातील सामान्य प्रशासन विभागाने उस्मानाबाद नगरपालिकेच्या मुख्याधिकार्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यामुळे नगरपालिकेचा भोंगळ कारभार उघड झाला आहे.
नागरिकांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी शासन पातळीवर लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या सोमवारी साजरा केला जातो. त्यामध्ये नागरिकांना असलेल्या तक्रारी दाखल कराव्यात आणि त्या संबंधीत विभागाने सोडवाव्यात असा नियम आहे. उस्मानाबाद नगरपालिके संदर्भातील अनेक तक्रारी लोकशाही दिनात दाखल झाल्या आहेत. मात्र नगरपालिकेच्या मुख्याधिकार्यांनी लोकशाही दिनात दाखल झालेल्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे नागरिकांनी जिल्हाधिकार्यांच्या कार्यालयातील लोकशाही दिनात तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयाने उस्मानाबाद नगरपालिकेच्या मुख्याधिकार्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यामुळे नगरपालिकेत एकच खळबळ उडाली आहे. या कारणे दाखवा नोटीसेला नगरपालिका मुख्याधिकारी कोणते उत्तर देतात हे पहाणे आवश्यक ठरणार आहे.
उस्मानाबाद नगरपालिकेच्या मुख्याधिकार्यांना जिल्हाधिकार्यांची कारणे दाखवा नोटीस
RELATED ARTICLES