आ. राणाजगजितसिंह पाटील भाजपसोबतच.. महाविकास आघाडीच्या चर्चांना विराम…

0
102

उस्मानाबाद – राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यानंतर तुळजापूर चे आ. राणाजगजितसिंह पाटील पूर्वाश्रमीच्या राष्ट्रवादीत येतील अशी चर्चा रंगली होती. काही कार्यकर्त्यांनी दादा परत राष्ट्रवादीत या अश्या पोस्ट ही सोशल मीडियावर केल्या होत्या मात्र या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. आ. पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. त्यांनी आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये आपली भविष्यातील भूमिका मांडली आहे.

मल्हार पाटील यांची पोस्ट
आम्ही कायम आपल्या सोबतच…


गेल्या १० वर्षांपासून जिल्ह्याच्या विकासाचा गाडा रुतलेला होता. उस्मानाबाद जिल्ह्यासह मराठवाड्याच्या जिव्हाळ्याच्या कृष्णा -मराठवाडा सिंचन योजनेचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. मा.देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेस भरीव निधीची तरतूद केली होती. वैद्यकीय महाविद्यालयास मंजुरी देऊन प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी त्वरित केंद्र सरकारकडे पाठवला. कौडगाव येथील प्रलंबित सौर ऊर्जा प्रकल्पाची निविदा काढल्याने हा प्रकल्प लवकरच सुरु होणार आहे. टेक्निकल टेक्स्टाईल हबला मंजुरी तसेच उस्मानाबाद-लोहारा सोयाबीन पिकविम्याचा प्रश्न मार्गी लावणे, अशी अनेक मोठी कामे आहेत जे मा.देवेंद्रजी यांनी त्वरित मार्गी लावली. सर्वात महत्वाचे म्हणजे नदी जोड हा महत्वाकांक्षी प्रकल्प मागच्या सरकारने हाती घेतला होता. आ.राणादादा पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे मा.देवेंद्रजी यांनी मंजूर केलेली कामे नवीन सरकार पूर्ण करणार कि सुडाचे राजकारण करून प्रलंबित ठेवणार ? हे बघावे लागेल.  

सत्ता असो अथवा नसो लोकांसाठी संघर्ष करणे हा आमचा पिंडच आहे. गेली १० वर्ष आपण लोकांसाठी संघर्ष करतच आलो आहोत. मागच्या आघाडी सरकारच्या काळात आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी वारंवार पाठपुरावा करून देखील जिल्ह्यातील विकासाची कामे होत नव्हती, तीच कामे मा.देवेंद्रजी यांनी करून दाखवली त्यामुळे त्यांना कायम साथ राहणार आहे. आदरणीय डॉ.पद्मसिंहजी पाटील साहेब यांचा संघर्षाचा, लोक कल्याण व जनसेवेचे वारसा पुढे न्यायचा आहे. येत्या काळात जिल्ह्यात भाजपची संघटन शक्ती अधिक वाढवण्यासाठी सर्वानी मिळून कष्ट घ्यायचे आहेत. भविष्यातील येणारा एक दिवस नक्कीच आपला असेल !

ही पोस्ट टाकताना मल्हार पाटील यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो पोस्ट केला  आहे



LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here