शहरात ३१० किलो प्लास्टिक व्यापार्‍यांकडून जप्त

0
37

प्लास्टिक बंदीसाठी नगरपरिषदेची धडक मोहिम
उस्मानाबाद/प्रतिनिधी
महाराष्ट्र प्लास्टिक ५० मायक्रोन पेक्षा कमी व सिंगल युज प्लास्टिक वर  बंदी आणून देखील नागरिकांकडून प्लास्टिकचा वापर होताना दिसत आहे. उस्मानाबादचे नगराध्यक्ष  मकरंदराजे निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली उस्मानाबाद शहरात प्लास्टिक बंदीची धडक मोहीम राबवण्यात येत आहे. यावेळी शहरात ३१० किलो प्लास्टिक  व्यापार्‍यांकडून जप्त करण्यात आले आहे.
या मोहिमेअंतर्गत बस स्थानकासमोरील फळ मार्केट, छत्रपती शिवाजी  महाराज चौक परिसर ह्या ठिकाणी सिंगल युज प्लास्टिकचा वापर करणार्‍या व्यापार्‍यांजवळील प्लास्टिक जप्त करून त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली. जवळपास ३१० किलो सिंगल युज प्लास्टिक व्यापार्‍यांकडून जप्त करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. उस्मानाबाद शहरात ग्रीनी टीमद्वारे अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली प्लास्टिक बंदी संदर्भात जनजागृतीचे काम सुरू आहे. प्लास्टिक वापराचे तोटे व पर्यायी व्यवस्था ह्या विषयी  व्यापार्‍यांना व नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले होते. वारंवार प्लास्टिकचा वापरू नका हे सांगून देखील  व्यापार्‍यांकडून कायद्याचे उल्लंघन होताना दिसते. याचाच परिणाम म्हणून नगरपरिषदेच्या कर्मचार्‍यांकडून व्यापार्‍यांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली, तसेच नगरपरिषद मुख्याधिकारी  बाबासाहेब मनोहरे यांनी व्यापार्‍यांना कोणत्याही प्रकारचे प्लास्टिक वापरू नये असे आवाहन केले. ह्या वेळी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, उपमुख्यख्याधिकरी पृथ्वीराज पवार, गट नेते युवराज नळे, स्वच्छता निरक्षक कांबळे, कार्यालयीन अधिक्षक  कुलकर्णी, व न. प. उस्मानाबाद चे कर्मचारी उपस्थित होते..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here