पळसप येथील ८ वे मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन अध्यक्षपदी प्रा. दत्ता भगत

0
64
  स्वागताध्यक्ष आ. विक्रम काळे यांची पत्रकार परिषदेत माहिती

उस्मानाबाद दि. २४शिक्षणमहर्षी वसंतराव काळे प्रतिष्ठाण, किसान वाचनालय पळसप व महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २ फेबुवारी २०२० रोजी ८ वे मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन पळसप ता. जि. उस्मानाबाद येथे संपन्न होणार आहे.संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. दत्ता भगत यांची निवड करण्यात आली आहे तर संमेलनस्थळास ‘शिक्षणमहर्षी वसंतराव काळे साहित्य नगरी’ नाव देण्यात आले आहे. शिक्षणमहर्षी आ. वसंतराव काळे यांच्या १४ व्या स्मृतीदिना निमित्त संमेलन आयोजन करण्यात आले आहे.
२ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी १०.३० वा. संमेलनाचे उद्घाटन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंढे यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिध्द साहित्यिक आसाराम लोमटे, खासदार
ओमराजे निंबाळकर, मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे आमदार सतिश चव्हाण, उस्मानाबाद विधानसभेचे आमदार कैलास पाटील आदिंची उपस्थिती राहणार आहे. दुपारी १.३० वा. ‘कृषी साक्षरता -काळाजी गरज’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. परिसंवादाचे अध्यक्ष स्थान कृषी महाविद्यालय, लातूरचे प्राचार्य डॉ. बी. एम. ठोंबरे भूषविणार आहेत. परिसंवादात कृषी अभ्यासक प्रा. डॉ. उध्दव आळसे, प्रगतशिल शेतकरी नवनाथ कसपटे व राजशेखर पाटील यांचा सहभाग होणार आहे.दुपारी ३.०० वा. कथाकथन होणार आहे. कथाकथनचे अध्यक्षस्थान कळमनुरीचे ज्येष्ठ कथाकार शिलवंत वाढवे भुषविणार आहेत. यामध्ये प्रभाकर शेळके, विवेक गंगणे, नयन राजमाने आदिंचा सहभाग होणार आहे.सायंकाळी ४.०० वा. प्रा. डॉ. वि. रा. राठोड यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रीतांचे कवी संमेलन होणार आहे. सायंकाळी ६.०० वा. संमेलनाध्यक्ष दत्ता भगत यांच्या अध्यक्षतेखाली समारोप समारंभ होणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे, सुप्रसिध्द साहित्यिक प्रा. डॉ. मथू सावंत, लातूर
ग्रामिण विधान सभेचे आमदार धिरज देशमुख उपस्थित राहणार आहेत. सकाळी ८.०० वा. संमेलन स्थळापासून ग्रंथदिंडी निघणार आहे. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे ग्रंथ दिंडीचे उद्घाटन करणार आहेत. संमेलन स्थळी ग्रंथ प्रदर्शन लावण्यात येणार आहे. ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन सकाळी १०.०० वा. जिल्हा ग्रंथालय अधिकारी उस्मानाबादचे अनिल सुर्यवंशी करणार आहेत. चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन सकाळी १०.१५ वा. सुप्रसिध्द कलावंत मंगेश निपाणीकर करणार आहेत. सुप्रसिध्द व्यंगचित्रकार किशोर शितोळे यांच्या व्यंगचित्र प्रदर्शन मांडण्यात येणार आहे. तसेच सौदागर वेबनाळे यांच्या पुरातन नाणी व वस्तूंच्या संग्रहाचे प्रदर्शन मांडण्यात येणार आहे. रात्री ८.०० वा. शिवकुमार मोहेकर यांचा संगित दरबार तसेच वसंतोत्सव सांस्कृतिक मंचचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.
तत्पूर्वी १ फेब्रुवारी रोजी नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल, बार्शी व आय. एम. ए. कळंब यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत कॅन्सर तपासणी शिबीर होणार आहे. रात्री ८.०० वा. ह. भ. प. प्रा. गोविंद इंगळे महाराज
अहमदपूरकर यांचे किर्तन होणार आहे. तरी मराठवाडयातील साहित्यिक, रसिक, शिक्षक, प्राध्यापक, नागरीक आदिंनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संमेलन संयोजन समितीच्या वतीने करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here