अमोल गायकवाड
उस्मानाबाद तालुक्यातील कनगरा येथे’मुख्यमंञी ग्रामीण पेयजल कार्यक्रमा’ अंतर्गत लाखो रुपये खर्च करुन बांधण्यात आलेली पाणी टाकी, विहिर पाडून, पाईप जोडणी करुनही धुळखात पडून आहे.
सविस्तर वृत्त असे,की राज्यातील नागरिकांना पुरेसे व शुध्द पिण्याचे पाणी मिळण्यासाठी मुख्यमंञी ग्रामीण पेयजल योजने या अंतर्गत सर्वंकष योजना राबवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता.त्याप्रमाणे शहरालगतच्या वाड्या-वस्त्या मधील नागरिकांना दरडोई प्रतिदिन ७० लिटर आणि ग्रामीण भागातील नागरिकांना ४० लिटर पाणी उपलब्ध करुन देण्याची योजना होती.या माध्यमातून पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा शासनाचा प्रयत्न होता.
त्यानुसार कनगरा येथे सन 2018-19 या वर्षात मुख्यमंञी ग्रामीण पेयजल कार्यक्रमा अंतर्गत लाखो रुपये खर्च करुन शासनानेही योजना राबवली.या योजने अंतर्गत गावात पाण्याची टाकी व गावापासून दोन-अडीच हजार मीटर अंतरावर विहीर पाडून पाईप जोडणी केली. तसेच गावातील काही भागात पाईप जोडणी केली.तसेच ग्रामपंचायतीने नळ जोडणीसीठी अनामत रक्कम म्हणून नागरिकांकडून प्रत्येकी ५०० रुपये प्रमाणे गेल्या वर्षभरात २०० नागरिकांकडून वसूली केली असून उर्वरीत राहिलेल्या भागातील पाईप जोडणी व नळजोडणी चालू असून ५०० रुपये प्रमाणे वसूलीही चालू आहे तरीही पाणी माञ नळाला येत नसल्याने कनगरा येथे येणार्या काळात पाणी प्रश्न पेटणार एवढ माञ नक्की.
तसेच येणार्या उन्हाळ्यात तरी पाणी प्रश्न मिटेल? या आपेक्षेत नागरिक असून उर्वरित भागातही पाईप जोडणी करुन नळ जोडणी ग्रामपंचायतच्या माध्यमातून व्हावी या आशेवर नागरिक असल्याचे चिञ सध्या तरी दिसत आहे.
ट्रान्सफार्मरची समस्या असून पाणी पुरवठा विभागाकडे नवीन ट्रान्सफार्मरची मागणी केली आहे.सध्या हरभरा पिक शेतात असल्याने शेतकर्यांच्या शेतातून विद्युत पोल घेवून जाण्यासही अडचण असून हरभरा पिक निघाल्यास नवीन ट्रान्सफार्मर बसवून गावाला तात्काळ पाणी देण्यात येईल.
– संजय दळवे
उपसरपंच – कनगरा