गावाचा विकास साधायचा असेल तर मतभेद टाळा-भास्कर पेरे पाटील

0
68

कळंब तालुक्यातील दहिफळ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने  पाटोदा गावचे आदर्श सरपंच पेरे पाटील यांचे व्याख्यान संपन्न झाले..यावेळी बोलताना पेरे पाटील म्हणाले की,गावाचा विकास साधायचा असेल तर आपआपसातील मतभेद बाजुला सारा..राजकारणामुळेच कितेक वर्षापासुन गावातील विकास खुंटला आहे.पाडापाडीशिवाय आपन काही करत नाहीत.प्रत्येक आळीतील जातीतील सरपंच,सदस्य निवडुन दिले तरी विकास का झाला नाही.असा सवाल केला. लोकांना योजनाची सवय लागल्यामुळे आळशी प्रवृत्ती वाढली.दुस-यावर अवलंबुन राहायी सवय लागली.त्यमुळेच नागरिकाचे कर्तव्य विसरुन गेली.गावातील नागरिकानी ग्रामपंचातचा कर भरला तर खासदार,आमदाराच्या फंडाची वाट पाहिची गरज भासणार नाही.घरातील सांडपाणी जमीनीत मुरवा,पाणी जपुन वापरा,झाडे लावा,शाळा महत्वाची आहे.जरा लक्ष द्या लाखो रुपये पगार शिक्षक उचलतात.आपली मुलं शिकली तरच समाजाचे कल्याण होणार आहे.शाळेकडे पालकांनी लक्ष दिले पाहिजे.गावातील विकास करायचा असेल तर विरोध करणे सोडा.सरपंच,सदस्य,ग्रामसेवकाकडुन कामे करुन घ्या तरच गावाचा काया पालट होईल..नागरिकांनी घर पट्टी भरलीतरच ग्रामविकास निधी जमेल या रक्कमेतुनच गावातील रस्ते,नाली,लाईट,व्यवस्थीत  होतील.म्हणुन नागरिकांनी ग्रामपंचायतला कर भरणा करावा…हे पाहिजे ते पाहिजे ते द्या करत बसण्यापेक्षा तुम्ही पहिल्यांदा द्या…नंतर ग्रामपंचायतला भांडा…शासकीय योजनावर अवलंबुन न राहता गावात उद्योग उभारा..आर्थीक विकास होईल..नुसतं निवडणुका घेऊन राजकारण करत बसल्याने गावाचा विकास होणार नाही..सारे एकत्र या चांगला वेळ देणारा व्यक्ती निवडुण द्या पाच वर्ष तो चांगले काम करेल..पुढील पाच वर्षात तुमच्या गावात विकासाची गंगा पोहचलेली असेल..असा अश्यावाद पेरे पाटील यांनी व्यक्त केला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन उस्मानाबाद कळंब मतदार संघाचे आमदार कैलास पाटील,पंचायत समिती कळंब उपसभापती,ग्रामविकास अधिकारी झांबरे,सरपंच शिल्पा पाटील,उपसरपंच बालाजी मते,शिवाजी मते बालाजी भातलवंडे,तुषार वाघमारे,चरणेश्वर पाटील अदी मान्यवर तसेच गावातील नागरिक महिला,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here