एक्स-ट्रिम फिटनेसकडून स्त्री कर्तृत्वाचा सन्मान..

0
45

उस्मानाबाद : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून उस्मानाबाद शहरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या आणि पुढील पिढीसमोर आदर्श ठेवणा-या कर्तृत्ववान स्रीयांचा सन्मान एक्स-ट्रिम फिटनेस कडून करण्यात आला.
या कार्यक्रमात महिला व विद्यार्थ्यीनींच्या समस्या निराकरणासाठी आयुष्यभर कार्य केलेल्या सहाय्यक पोलिस निरीक्षक माया दामोदरे (पानसे), सामान्य मुलगी ते आंतरराष्ट्रीय पातळीवर खो खो संघाला अनेक वेळा सुवर्ण पदक मिळवून देणारी कर्णधार क्रीडाधिकारी सारिका काळे, महाराष्ट्राच्या कलाक्षेत्रात रंगावलीकार म्हणून प्रसिद्ध असलेल्या शुभदा पंडित, अल्पकाळातच वैद्यकीय क्षेत्रात आपला ठसा उमटवणा-या डाॅ.प्रियंका चौरे, मागील दोन वर्षांपासून एक्स-ट्रिम फिटनेसच्या माध्यमातून महिलांना फिटनेसचे धडे देण्या-या मानसी डोलारे यांचा सत्कार जि.प.अध्यक्षा अस्मिता कांबळे यांच्या हस्ते करण्यात आला. इंजिनियरींग पदवी घेवून अध्यापन करत करत राजकारणात वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवणा-या जि.प.अध्यक्षा अस्मिता कांबळे यांचाही विशेष सत्कार एक्स-ट्रिम तर्फे करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना अस्मिता कांबळे यांनी महिलांनी शरिराबरोबरच मनानेही कणखर असले पाहिजे असे प्रतिपादन केले. माया पानसे यांनी महिलांनी नाती तोडण्यापेक्षा ती जोडायला शिकले पाहिजे अशा भावना व्यक्त केल्या. तर शुभदा पंडित यांनी आयुष्यात कलेला किती महत्त्व आहे हे सांगितले.
याच कार्यक्रमात डाॅ.प्रियंका चौरे यांचा महिलांतील स्थूलपणा, विविध आजार, पोषण आहार आणि व्यायाम या विषयावर मार्गदर्शनपर संवाद आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना डाॅ.प्रियंका यांनी दैनंदिन जीवनातील आहार आणि व्यायामामाचे महत्त्व अतिशय सोप्या शब्दात सांगितले. महिलांना होणारे विविध आजार त्या मागची कारणे आणि उपायही त्यांनी सांगितले. त्वचारोग, केसांशी संबंधित समस्या आणि विशेष करून सध्या धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना व्हायरस विषयी त्यांनी माहिती दिली.
तत्पूर्वी कार्यक्रमाचे प्रास्ताविक एक्स-ट्रिमच्या संचालिका मानसी डोलारे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार सरोज देवकुळे यांनी मानले.
कार्यक्रमासाठी शहर व परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शबाना शेख, संगीता पाठक, प्रियंका पवार, रंजना पेठे आदींनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here