उस्मानाबाद – कोरोना व्हायरस चा मुकाबला करण्यासाठी उस्मानाबाद नगरपालिका पुढे सरसावली आहे. नागरिकांना वैयक्तिक स्वछता राखता यावी यासाठी शहरात आता १२ हॅण्ड वॉश पॉइंट्स ठरवण्यात आले असल्याची माहिती नगराध्यक्ष राजेनिंबाळकर यांनी दिली.
उस्मानाबाद शहर हे जिल्ह्याचे ठिकाण असल्याने येथे मोठी बाजारपेठ व सर्व सरकारी कार्यालये आहेत यामुळे शहरामध्ये होणारी मोठी गर्दी लक्षात घेता कोरोना व्हायरस च्या विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी उस्मानाबाद मध्ये येणारे प्रवासी तसेच शहरातील स्थायी नागरिक यांचे हात धुण्यासाठी एकूण बारा ठिकाणे उपलब्ध करणार असा उत्कृष्ठ व लोकोपयोगी निर्णय उस्मानाबाद नगर परिषद व नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी घेतला.
हात धुण्याची बारा ठिकाणे पुढीलप्रमाणे आहेत.
नगर परिषद उस्मानाबाद, बस स्टँड, तुळाजा भवाणी शॉपिंग सेंटर, जिल्हाधिकारी कार्यालय, प्रशासकीय मध्यवर्ती इमारत (सेंट्रल बिल्डिंग), आरक्षण क्र.73, देशपांडे नाका भाजी मंडई, नेहरू चौक , साठे चौक बाजार मैदान, बार्शी नाका,दर्गा देवस्थान समोर या पैकी कोणत्याही ठिकाणी गेल्यावर आपण आपले हात स्वच्छ धुवून घ्यावेत असे आवाहन नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी केले आहे.