तुळजापूर:-
तालुक्यातील खडकी येथे अजिंक्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्था खडकी या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष धोंडीराम जवान यांच्या वतीने कोरोना आजारापासुन नागरिकांचा बचाव व्हावा म्हणून चेहर्यावर लावण्यासांठी मोफत मास्कचे वाटत करण्यात आले.
यावेळी संस्थेचे सचिव राम जवान बोलताना म्हणाले की संपूर्ण भारतात कोरोना आजाराने धुमाकूळ घातला असून या आजारापासुन लोकांचा बचाव व्हावा म्हणून भारत सरकार, पोलिस प्रशासन,डॉक्टर व इतर कर्मचारी मोठ्या शर्थीने प्रयत्न करत आहेत. त्याच धर्तीवर अजिंक्य संस्थेच्या वतीने ग्रामीण भागातील लोकांना कोरोना आजाराविषयी जनजागृती करून, त्या आजारापासून संरक्षण व्हावे म्हणून संस्थेने मोफत मास्क वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला आहे.
तसेच हा आजार संसर्गजन्य असल्याने जास्तीत जास्त लोकांनी एकत्र येऊ नये.सर्दी-खोकला यासारख्या आजाराची लक्षणे दिसून आल्यास तात्काळ रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावे. मा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्याप्रमाणे पाच पेक्षा अधिक लोकांनी एकत्र येऊ नये. या आजाराला घालविन्यासांठी सर्वांनी घरातच बसुन शासनास सहकार्य करावे असेही ते म्हणाले. शेवटी राम जवान म्हणाले की संस्थेच्या वतीने खडकी ग्रामस्थांना आणखी सोय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी राजेंद्र जवान,सिध्दु सुरवसे,किशोर जवान,अविनाश जवान,संतोष जाधव,ज्ञानेश्वर जवान,ईस्माईल पटेल आकाश जवान,दादाराव खोडके,हणमंत जवान.