तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेले द्राक्ष झाले मातीमोल ;वेळेत मालाचा उठाव होत नसल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावतोय

0
51

उमरगा( प्रा. युसुफ मुल्ला ): कोरोनाचे संकट देशासह ग्रामीण भागात वेगवेगळ्या क्षेत्रावर परिणाम होत आहे. जिवनावश्यक वस्तु सोडून इतर दुकाने बंद झाले आहेत. संकट इतके मोठे आहे की येणाऱ्या काळात संचारबंदी वाढण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांच्या मालाला बाजारात विक्रीसाठी नेण्यास मुभा आहे. परंतु कोरोनाच्या भितीने व्यापारी द्राक्षाचे उठाव करण्यासाठी सध्या येत नाहीत. परिणामी अनेक दिवसापासुन कष्ठाने पिकवीलेली बाग शेतकऱ्याच्या डोळ्यादेखत नासाडी होत आहे. देश एकीकडे कोरानाशी लढतो आहे परंतु शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला जातोय. यासाठी योग्य नियोजन झाल्यास शेतकरी जगेल अन्यथा शेतकऱ्यांचा भविष्यकाळ अंधारातच आहे.
——————
सद्यस्थितीत देशावर आलेल्या कोरोना आजाराचा प्रादुर्भाव आणि अधूनमधून होत असलेल्या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील द्राक्षे व कलिंगड यासह फळबागा, भाजीपाला उत्पादनात शेतकऱ्यांना सर्वाधीक फटका बसत आहे. राज्यात संचारबंदी असल्याने बाजारपेठ ठप्प आहेत. लाखों रुपये खर्च करून जोपासलेले पीक मातीमोल होत आहे. द्राक्ष बागा जागेवरच झडून जात असल्याने मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुका हा कायम दुष्काळग्रस्त राहणारा तालुका असल्याने सातत्याने शेती व्यवसाय हा अडचणीचा ठरत आहे. प्रतिवर्षी कोणत्यान कोणत्या कारणाने आर्थिक संकट ओढावले असतेच उमरगा तालुक्यातील नारंगवाडी येथील शेतकऱ्यांनी पाच एकर क्षेत्रात उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करत द्राक्षांची बाग फुलविली असून अधूनमधून होणाऱ्या वातावरणातील बदलाने किड रोगांचा प्रादुर्भाव होत होता. पदरमोड करून औषधी फवारणी व खतांचा मारा करून तळहाताच्या फोडाप्रमाणे द्राक्ष यासह फळबाग जपली. ऐन काढणीच्या काळातच कोरोना आजाराचे देशावर आलेल्या संकटात सद्यस्थितीला बागेकडे खरेदीसाठी व्यापारी येत नसल्याने तयार झालेला माल झाडावरच सडुन व नासुन जात आहे. लहान लेकराप्रमाणे पाण्याचे योग्य नियोजन करीत द्राक्षांच्या बागेची देखभाल केली. आतापर्यंत द्राक्ष बागेसाठी सात लाख रुपये इतका खर्च झाला आहे. वेळेत मालाचा उठाव होत नसल्याने संपूर्ण बागेतील द्राक्षे वेलावरच खराब झाले असून परिपक्व झालेले जमिनीवर पडून नासाडी झाली आहे.शासनाने फळ बागायतदारांकडे लक्ष दिल्यास नैसर्गिक व आपत्ती कालिन स्थितीने निर्माण झालेल्या संकटातून बाहेर पडण्यासाठी मदत करणे आवश्यक आहे.
अवघ्या दहा मिनिटांसाठी आलेल्या अवकाळी वारा व पावसाने होत्याचे नव्हते झाले. त्यात कोरोना च्या संसर्गामुळे बाजारपेठ बंद असल्याने बाहेरून येणारे व स्थानिक व्यापारी द्राक्ष बागेकडे येण्यास तयार नसल्याने शेतकऱ्यांवर कुऱ्हाड कोसळली आहे. बाजारपेठा बंद पडल्याने शेतातच मालाची माती होत आहे. घडलेल्या घटनेने हतबल झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे होऊन नुकसान भरपाई देऊन आधार देण्याची गरज आहे.
—————-
सद्यस्थितीत चांगल्या पद्धतीने माल लागला असून अंदाजे पंधरा ते सोळा लाखांचे उत्पन्न होण्याची आशा होती. या मालाचा वेळेवर उठाव न झाल्यास कर्जाच्या ओझ्याखाली जगणे अवघड होईल. निसर्गाच्या व संकटाच्या काळात इतके कष्ट करूनहि हातात काहीच येत नसल्याने संबंधित विभागाने नुकसानीचे पंचनामे करून प्राप्त अहवाल शासनाकडे पाठवून आर्थिक मदत मिळवून द्यावी.
धनराज सुर्यवंशी, नारंगवाडी
—————

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here