तासगावातील त्या महिलेच्या संपर्कातील तिघांचे अहवाल निगेटिव्ह तासगावकर नागरिकांनी सोडला सुटकेचा निश्वास

0
46

तासगाव प्रतिनिधी/ राहुल कांबळे
तासगाव शहरात मुंबईवरून आलेल्या ५८ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्याच्यां संपर्कातील त्या महिलेचा पती, मुलगा, तसेच त्या महिलेचा भावाचा मुलगा त्या महिलेला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी बरोबर गेलेला होता. त्यामुळे सदर च्या तिघांचे हे
स्वँब काढून घेतले होते. तिघांचेही अहवाल निगेटिव्ह आल्याची बातमी तासगावात धडकताच तासगाव शहरात आनंदाचे वातावरण पसरले  आहे. व सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. या गोष्टीची चर्चा तासगाव शहरातील चौका चौकांमध्ये सुरू आहे‌.दुपारपासूनच त्यासंदर्भात तासगावकर नागरिक प्रसारमाध्यमांच्या पत्रकारांना याबाबत माहिती विचारत होते.
सदरची माहिती पंचायत समितीचे आरोग्य अधिकारी डॉ.अनिल सूर्यवंशी यांनी प्रसार माध्यमांना  दिली आहे‌. आतातरी तासगाव नगरपालिका प्रशासनाने सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. तर त्यास पोलीस प्रशासनाने सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. वेळप्रसंगी कठोर भूमिका घेऊन कठोर कारवाई करण्याची ही गरज निर्माण झाली आहे. यास पर जिल्ह्यातून किंवा परराज्यातून येणाऱ्या आपल्याच नागरिक बांधवांनी सुद्धा सहकार्य करण्याची गरज निर्माण झाली आहे. प्रशासन जे काही करत आहे ते आपल्या  तुमच्या-आमच्या संरक्षणासाठी करत आहे. याची जाणीव तासगावकर नागरिकांनी ठेवणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here