आटपाडी दि.१४( प्रतिनिधी):
रक्तदान केल्याने कुणाचा तरी जीव वाचणार असेल तर एक सामाजिक बांधिलकी या नात्याने रक्तदान करायलाच हवे असा संकल्प भरारी ग्रुपच्या वतीने जागतिक रक्तदान दिनानिमीत्त करण्यात आला.कोरोना या विषाणूने जगात थैमान घातल्याने कोरोना बाधित रुग्णांना व इतर रुग्णांना रक्ताची खूप टंचाई भासू लागली आहे.राज्यातील सर्व रक्तपुरवठा करणारा रक्तपेढीमधे रक्तसाठा अल्पप्रमाणात आहे.रक्तदान ही काळाची गरज आहे.कारण विज्ञान कितीही पुढे गेले असले तरी रक्त तयार करता येता येणार नाही. त्यामुळे रक्तपुरवठ्यच्या तुटवडावर मात करण्यासाठी आज भरारी ग्रुपच्या वतीने शासकीय जिल्हा रक्तपेढीच्या सहकार्याने अंबर हाॅल कोथरूड़ येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.कोरोना काळातील सर्व सोशल डिस्टनसचे नियम पाळुन 158 रक्तदात्यानी रक्तदान करुन सहभाग नोंदविला.
सर्व रक्तदात्याना मास्क,सेनिटाइझर व ‘अर्सेनिक अल्बम 30 या होमाओपॅथिक गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात आले. सदर नियोजित शिबिरासाठी ऑनलाइन नोंदणी ठेवण्यात आली होती. या रक्तदान शिबिरामधे 27 नविन रक्तदात्यांनी प्रथमच रक्तदान केले.या शिबिरात पोलिस,युवक-युवती व नागरिक यानी आवर्जून सहभाग नोंदविला.सदर शिबिरास पोलीस अधिकारी राऊत साहेब, काशीद साहेब, चार्टर्ड अकाउंटट सचिन वास्कर साहेब, सिडकोचे करण शिंदे साहेब , डॉ. प्रीतम संचेती, फॅबटेक उद्योग समूहाचे सुनिल रूपनर, आम्ही सांगलीकरचे अध्यक्ष अरुण कदम, आदी मान्यवरांनी सदिच्छा भेट देऊन भरारी ग्रुपच्या या कार्याचे कौतुक केले.
हे शिबीर यशस्वी करण्यासाठी भरारी ग्रुपचे शैलेश घाडगे, स्वप्निल डोळस,विशाल पाटील, भगवान खसे, रोहन तावरे ,संतोष इंगळे,महेश कदम,नामदेव शेलार, रविंद्र कोथेरे,वृषाली राजहंस, शुभदा भोसले, स्वाती टकले आदी पदाधिकारीने परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे आयोजन भरारी ग्रुपचे संस्थापक-अध्यक्ष सुभाष सातपुते यानी केले होते.