बेताल वक्तव्यामुळे आम. पडळकर जोमात तर तासगावातील राष्ट्रवादी काँग्रेस कोमात

0
47

 तासगाव ( राहुल कांबळे )
शरद पवार हे अनेक वर्षापासून महाराष्ट्राचे नेतृत्व करीत असून ते राज्यातील बहुजनांवर नेहमीच अत्याचार करण्याची भूमिका घेतात व भविष्यात तीच भूमिका कायम ठेवतील त्यांच्याकडे कोणतीही विचारधारा नाही ना कुठला अजेंडा नाही, व्हिजन नाही राज्यातील छोट्या मोठ्या समूहातील घटकांना अडकवायचे व आपल्या बाजूला वळवून त्यांच्यावर सतत अन्याय करायचा धनगर समाजाच्या आरक्षणासाठी राजकारण करायचे हे प्रकार पवार करीत आहेत तर शरद पवार हे महाराष्ट्रातील महाराष्ट्राला लागलेले कोरोना आहे अशी जहरी टीका आम. गोपीचंद पडळकर यांनी केली आहे परंतु यासंदर्भातसांगली जिल्ह्यासह महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस मधून जोरदार पडसाद उमटत आहेत त्या वक्तव्याचा निषेध व्यक्त होत आहे संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. पडळकरांनी पवार साहेबांची जाहीर माफी मागावी अशी मागणी होत आहे.व पडळकरांवर टीकेची झोड उठली आहे अशा वेळी मात्र महाराष्ट्राचे लोकनेते स्वर्गीय आर आर आबा पाटील यांना शरद पवार यांनी एवढे मोठे केले ग्रामीण भागातील एका छोट्या शेतकरी कुटुंबातील सामान्य कार्यकर्त्याला राज्यातील सर्व मोठी पदे दिली त्यांच्या दुर्दैवी निधनानंतर ही स्व आबांच्या कुटुंबीयांना कोणते अंतर दिले नाही.स्व.आबांचे कुटुंब आपले कुटुंब मानले, त्यांच्या पश्चात त्यांच्या घरात सलग दोन वेळा आमदारकी दिली आहे तरीही त्यांच्या घरातून आमदार सुमनताई पाटील, राष्ट्रवादीचे सध्याचे तालुक्यातील सूत्रधार सर्वेसर्वा सुरेश पाटील, युवा नेते रोहित पाटील, स्मिता पाटील- थोरात,राष्ट्रवादी सांगली जिल्हा ग्रामीण अध्यक्ष अविनाश पाटील तासगाव तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष किंवा तासगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, युवक राष्ट्रवादीचे कोणताही पदाधिकारी गप्प का आहेत याची उलट-सुलट चर्चा सध्या तासगाव शहरासह तासगाव तालुक्‍यात सुरू आहे सोशल मीडियावर एखादी निषेधाची पोस्ट वगळता कोणताही निषेध व्यक्त होताना दिसत नाही किरकोळ कामासाठी प्रसिद्धीसाठी धडपडणार्‍या युवक राष्ट्रवादी काँग्रेस,व विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसच्यां स्वतःला पदाधिकारी म्हणवणाऱ्या कडून ही या मोठ्या वक्तव्याबद्दल कोणतीही निषेधाची प्रतिक्रिया आलेली नाही हा प्रकार सध्या तासगाव तालुक्यात सुरू आहे.ही सर्व मंडळी सध्या शांत कशी हा प्रसारमाध्यमांना पडलेला प्रश्न आहे खरे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तातडीने पत्रकार परिषद घेणे आवश्यक असताना व सदरच्या घटनेचा निषेध नोंदवणे आवश्यक असताना फक्त सोशल मीडियावर पत्रकबाजी करण्यात  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व्यस्त आहेत त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते खास.शरद पवार यांच्यावर नितांत मनापासून प्रेम करणार्‍या सामान्य जनतेतून मात्र या सर्व नेत्यांबद्दल राग व्यक्त होत आहे.व राष्ट्रवादींच्या तासगाव, तालुक्यातील नेत्यांबद्दल संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत तर राज्यातून पडळकर यांच्यावर टीका सुरू होताच आपण भावनेच्या भरात बोललो अशी सारवासारव करण्याचा प्रयत्न पडळकर यांनी केला आहे.
सर्वात महत्त्वाचे ज्येष्ठ नेत्या बद्दल केलेले खालच्या पातळीवरचे वक्तव्य हे पडळकरणी स्वतःच्या मनाने केलेले आहे की त्याला बोलवता धनी कोण आहे हे शोधणे गरजेचे आहे.
भाजपाने असे वक्तव्य कार्यकर्त्यांच्या तोंडी घालून नवीन राजकारण सुरू केले आहे का ??

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here