मिरज प्रतिनिधी
येथील कबाडे गल्ली आणि रमा उद्यान या दोन ठिकाणी मुबंई येथून आलेल्या दोन वृद्धांना कोरोनाची लागण झाल्याने मिरजेत खळबळ उडाली आहे ,महापालिका वैद्यकीय विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोघांचे स्वाब घेतल्याने पुढील धोका टळला आहे
कबाडे गल्ली येथे मुबंई येथून आलेली 60 वर्षाची महिला कोरोना पोजिटीव्ह निघाली आहे ,त्याच बरोबर रमा उद्यान येथे ही मुबंई येथून आलेल्या वृद्धाला कोरोना झाला आहे ,आज त्यांचे कोरोना चाचणी रिपोर्ट आल्याने महापालिका वैद्यकीय विभागाने जागेवर धाव घेतली होती ,महापालिका वैद्यकीय विभागाने मुबंई येथून आलेल्या वृद्ध प्रवाशांची सक्तीची कोरोना चाचणी सुरू केली आहे .उपायुक्त स्मृती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका वैद्यकीय विभागाचे डॉ वैभव पाटील,डॉअक्षय पाटील,किरण कांबळे यांनी घरोघरी जाऊन वृद्धांची तपासणी सुरू केली आहे. कबाडे गल्ली आणि रमा उद्यान येथे मुबंई येथून आलेल्या दोन वृद्धांची कोरोना चाचणी दोन दिवसांपूर्वी घेण्यात आली होती. या चाचणीचा अहवाल आज कोरोना पोजिटीव्ह आला आहे ,आज वृद्ध महिलेच्या संपर्कात आलेल्या दोन नातेवाईकांना इन्स्टिट्यूट कोरोंटाईन केले आहे ,रमा उद्यान येथील वृद्धांच्या संपर्कात आलेल्या 4 जणांना इन्स्टिट्यूट कोरोंटाईन करण्यात आले आहे .रमा उद्यान व कबाडे गल्ली येथे कोविड 19 प्रतिबंधक क्षेत्र घोषित केले आहे