तासगावच्या डॉ. सचिन पाटील यांच्यावर कारवाई करा अमोल काळे यांची मागणी

0
67
  • कोरोनाबाधित महिलेवर उपचार केल्याचे प्रकरण ; तहसीलदारांना निवेदन

तासगाव प्रतिनिधी
     तासगाव तालुक्यातील वाघापूर येथील कोरोनाबाधित महिलेला स्वतःच्या स्वामी समर्थ हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करुन घेऊन दवाखान्यातील स्टाफच्या आरोग्याशी खेळणाऱ्या डॉ. सचिन पाटील यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी शिवसेनेचे तालुकाप्रमुख अमोल काळे यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी तहसीलदार कल्पना ढवळे यांना दिले आहे.

    त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, तासगाव येथील डॉ. सचिन पाटील यांनी शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून वाघापूर येथील एका कोरोनाबाधित महिलेला आपल्या दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. तिच्यावर चार दिवस उपचारही केले. या चार दिवसांत संबंधित महिलेला कोरोनाची लक्षणे दिसत होती. मात्र डॉ. सचिन पाटील यांनी याबाबत आरोग्य विभागाला कळवले नाही.

     दरम्यानच्या काळात दवाखान्यातील अनेक कर्मचारी या पीडित महिलेच्या संपर्कात आले. दुर्दैवाने त्यानंतर या महिलेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर याच दवाखान्यातील चौघांना कोरोनाची लागण झाली.

      डॉ. सचिन पाटील यांच्या बेफिकीरीमुळे शहरात कोरोनाची साखळी वाढत गेली. तालुक्यात यापूर्वी कोरोनाचे रुग्ण कमी होते. मात्र डॉ. पाटील यांच्या निष्काळजीपणामुळे तालुक्यातील लोकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. तालुक्यातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शिवाय प्रशासनाला १० दिवस शहर बंद ठेवावे लागले. याचा त्रास व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांना होत आहे. त्यामुळे डॉ. सचिन पाटील यांच्यावर कारवाई करण्यात यावी. डॉक्टरांच्या बेफिकीर वागणुकीमुळे हॉस्पिटलमधील एकूण स्टाफ पैकी चार जणांना कोणाची लागण झाली आहे. याची संपूर्ण जबाबदारी डॉक्टरांचे आहे. त्यांच्यावर कारवाई करणे बाबत अनेक प्रसारमाध्यमातून मागणी करण्यात आली होती. दैनिक जनमत चे प्रतिनिधींनीही याबाबतीत या विषयावर प्रकाश टाकला होता. सर्वात महत्त्वाचे सदस्य डॉक्टरांनवर कारवाई करण्याबाबत प्रशासनाने संकेत दिले होते. परंतु यामध्ये राजकीय हस्तक्षेपही झाल्याची चर्चा सध्या तासगाव शहरांमध्ये सुरू आहे. याबाबतीत पोलीस अधिकारी राजकीय दबावाला बळी पडल्याची उघड चर्चा तासगाव शहरात सुरू आहे. यामुळे तासगाव संपूर्ण शहरा वेठीस धरण्यात आले आहे. यामुळे तासगाव शहरातील संपूर्ण नागरिक संतप्त झाले आहेत.त्यामुळे कारवाई होण्याबाबत जनतेतून जोरदार मागणी होत आहे तसेच राजकीय कार्यकर्तेही चर्चा करीत आहेत तर काही कार्यकर्ते उघडपणे कारवाईची मागणी करत आहेत. यामध्ये शहर शिवसेना व तालुका शिवसेना आघाडीवर आहे.

      निवेदनावरसेना तालुकाप्रमुख अमोल भैया काळे, केशव वाघमोडे, संदीप माळी, बाळासाहेब महाडिक, पृथ्वीराज माने, अभिजित पवार यांच्यासह इतरांच्या सह्या आहेत:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here