महाविकास आघाडीत बिघाडी? सत्यजित तांबे यांचा शिवसेना – राष्ट्रवादीला घरचा आहेर

0
55

उस्मानाबाद – महाराष्ट्र विकास आघाडीत सारं काही आलबेल नसल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी सरकारने सुरू केलेल्या महा जॉब्स पोर्टलच्या उद्घाटनप्रसंगी केलेल्या जाहिरातीत काँग्रेसच्या मंत्र्यांचा फोटो न वापरल्याने समाज माध्यमात पोस्ट टाकून नाराजी व्यक्त केली आहे. सत्यजित तांबे यांनी केलेल्या पोस्ट मध्ये म्हटले आहे की, #महा_जाॅब्स् ही योजना महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची आहे, की शिवसेना-राष्ट्रवादीची ?
आघाडीचे गठन होत असतांना, ठरलेल्या किमान समान कार्यक्रमाची व त्यातील शिष्टाचारांची अंमलबजावणी का होत नाही ? हा माझ्या सारख्या सामान्य काॅंग्रेस कार्यकर्त्याला पडलेला प्रश्न आहे.
यापूर्वी महाविकास आघाडीत काँग्रेसला स्थान देण्यात येत नसल्याचे सांगत अनेक मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यात तांबे यांनी केलेल्या पोस्ट नंतर नाराजीनाट्याचा नवा अंक सुरू झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here