पोलीस कर्मचाऱ्यांस भरधाव टेम्पोने ठोकरल्याने पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू

0
78

 

टेंभूर्णी (प्रतिनिधी):- पुणे सोलापूर हायवे रोडवरील वरवडे येथील टोल नाक्यावर ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांस भरधाव टेम्पोने ठोकरल्याने पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. पोलीस नाईक सागर औदुंबर चोबे रा. बार्शी असे मयत पोलीस कर्मचार्यांचे नाव आहे

सोलापूर – पुणे राष्ट्रीय महामार्गावर वरवडे येथील टोल नाक्यावर टेम्भुर्णी च्या दिशेने निघालेल्या टेम्पोला थांबवण्यासाठी ड्युटीवर असलेल्या पोलीस नाईक चोबे यांनी हात केला होता, यावेळी भरधाव आलेल्या टेम्पोने चोबे यांना ( रविवार ) सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

टेम्पो क्रमांक ( MH 04, HD- 0170 ) हा हैदराबाद हुन मुंबईला मेडिसीन घेऊन निघाला होता. टेम्पो चालक आरोपी नवनाथ शिवाजी गुट्टे ( रा.परळी वैजनाथ, जि. बीड ) यास अटक करण्यात आले आहे.

अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, करमाळा उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ विशाल हिरे, महामार्ग पोलिस निरीक्षक रामेश्वर पडवळकर, पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी घटनस्थळी भेट दिली.

यात चोबे यांचा जागीच मृत्यू झाला. टेम्पो आणि चालकास ताब्यात घेण्यात आले असून भा द वी कलम ३०४(२) नुसार टेंभूर्णी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here