विटा प्रतिनिधी :
1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून नगराध्यक्षा सौ प्रतिभाताई पाटील यांचे वतीने माजी नगराध्यक्ष अॅड.वैभव पाटील यांच्या हस्ते विटा नगरपालिकेच्या सर्व कर्मचारी बांधवांना कामगार दिनाच्या शुभेच्छा म्हणून फराळाचे वाटप केले.
यावेळी बोलताना अॅड. वैभव पाटील म्हणाले, कोरोनाच्या महामारीत विटा नगरपरिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आपले कर्तव्य बजावले आहे. स्वच्छ सर्वेक्षण मध्ये विटा नगरपरिषदही सलग तीन वर्षे भारतात अव्वल ठरत आहे.याचे सर्व श्रेय विटा नगरपरिषदेच्या कर्मचारी बांधवाना जाते म्हणून प्रत्येक वर्षीप्रमाणे याहीवर्षी कामगार दिनाचे औचित्य साधून सर्व कर्मचाऱ्यांना गोड फराळाचे वाटप करीत आहे,असे माजी नगराध्यक्ष अॅड.वैभव पाटील यांनी सांगितले.
यावेळी नगरसेवक संजय तारळेकर,फिरोज तांबोळी, गजानन निकम,संदेश पवार,राहुल घोरपडे तसेच विटा नगरपरिषदेचे प्रमुख कर्मचारी उपस्थित होते.