उस्मानाबाद प्रतिनिधी: जिल्ह्यातील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना आगामी 25 वर्षासाठी भाडेतत्वावर शिवसेना आ . डॉ तानाजीराव सावंत यांच्या भैरवनाथ शुगरला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत दि .२५ रोजी हा निर्णय निविदा प्रक्रिया पार पडल्यानंतर घेण्यात आला. या प्रक्रियेसाठी अथक प्रयत्न करणारे बँकेचे चेअरमन प्रा सुरेश बिराजदार व संचालक मंडळाचा तेरणा बचाव संघर्ष समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला .
जिल्ह्याचा जिव्हाळ्याचा विषय असणाऱ्या व जिल्ह्याच्या अर्थकारणाचा महत्त्वाचा दुवा असणारा तेरणा सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून प्रा सुरेश बिराजदार यांनी वेळोवेळी प्रशासना सह विविध अडचणींना मार्ग काढण्यासाठी केलेला अथक प्रयत्नाला यश आल्याने तेरणा बचाव संघर्ष समितीच्या वतीने श्री अॅड . खोत, राहुल वाकोरे ,अमोल समुद्रे ,निहाल काजी ,तानाजी माळी ,गुणवंत सुतार ,संग्राम देशमुख यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेत चेअरमन सुरेश बिराजदार व व्हाईस चेअरमन कैलास शिंदे यांच्यासह संचालक मंडळाचा सत्कार केला .
यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष धनंजय सावंत, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष कैलास शिंदे, संचालक सुनील चव्हाण,संजय देशमुख, ज्ञानेश्वर पाटील ,विकास बारकुल, सतीश दंडनाईक, नागप्पा पाटील, सुग्रीव कोकाटे ,त्र्यंबक कचरे, भारत डोलारे ,पुष्पाताई मोरे ,कार्यकारी संचालक विजय घोणसे-पाटील आदींची उपस्थिती होती .