back to top
Sunday, September 15, 2024
Google search engine
Homeताज्या बातम्याइलेमेंटरी ग्रेड व इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा घेण्याची कलाध्यापक संघाची मागणी

इलेमेंटरी ग्रेड व इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा घेण्याची कलाध्यापक संघाची मागणी


उस्मानाबाद-महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ पुणे शाखा उस्मानाबाद जिल्हा कलाध्यापक संघाच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शासकीय रेखाकला परीक्षा इलेमेंटरी ग्रेड व इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा घेण्यात यावे बाबत जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले .सदर परीक्षा प्रतिवर्षी सप्टेंबर महिन्यात घेण्यात येत असते परंतु कोरोना परिस्थितीमुळे मागील दोन वर्षापासून शाळा-कॉलेज सर्वच बंद असल्यामुळे परीक्षा न घेता दहावीच्या वर्गाच्या शैक्षणिक सन २०२१-२०२२ वर्षातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या दोन्ही ग्रेड परीक्षा गुणाचे नुकसान होऊ नये याकरिता दोन्ही ग्रेड परीक्षेचे नियोजन डिसेंबर २०२१पर्यंत करण्यात  यावे यावे तसेच या परीक्षा घेण्याकरिता महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ संपूर्ण सहकार्य करेल याचे निवेदन देण्यात आले या प्रश्नाकडे मुख्यमंत्री यांनी जातीने लक्ष देऊन राज्यातील सर्व कलाशिक्षक , कलाकार , कलाप्रेमी , विद्यार्थी, पालक यांच्या अपेक्षा आहेत तरी मुख्यमंत्री महोदय सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करतील अपेक्षा या निवेदनातून आशा बाळगण्यात आली .जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद तहसीलदारअर्चना मैंदर्गी यांना कलाध्यापक संघाचे विभागीय सहकार्यवाह तथा जिल्हासचिव शेषनाथ वाघ , जिल्हाध्यक्ष नानासाहेब बोराडे , जिल्हासदस्य पदाधिकारी शिवाजी भोसले ,मकरंद खारके , गणेश पांचाळ आदी कलाध्यापक बांधव उपस्थित होते.


RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments