परंडा (भजनदास गुडे ) आयान मल्टीट्रेड एल्.एल.पी.संचलित बाणगंगा सहकारी साखर कारखान्याकडे गळीत हंगाम 2022-2023 करिता गाळपास आलेल्या ऊस उत्पादक शेतकरी यांच्या बॅक खात्यावर प्र.मे.टन रक्कम रु 75/- प्रमाणे दुसरा हप्ता जमा केला असल्याची माहिती कारखाना प्रशासनाने प्रसिद्वीपत्रकाद्वारे दिली आहे.
आयान-बाणगंगा या साखर कारखान्यांने गाळप हंगाम 2022-2023 मध्ये 481636.249 मे टन उसाचे गाळप केले असून 10.94 % साखर उतारा मिळाला आहे. कारखान्याने 2022-2023 करिता गळीतास आलेल्या ऊसासाठी पहिला हप्ता प्र.मे.टन रक्कम रु 2350/- प्रमाणे यापूर्वीच समंधीत शेतकऱ्यांना वेळेत अदा केला आहे.आत्ता “बैलपोळा सणाचे” औचित्य साधुन गळीत हंगाम 2022-2023 मध्ये गाळपास आलेल्या ऊसाचे दुस-या हप्त्यापोटी प्र.मे.टन रक्कम रु 75/- प्रमाणे ऊसबिल ऊस ऊत्पादक शेतक-यांचे “भाऊसाहेब बिराजदार ना.सह.बँक” शाखा परंडा व भूम शाखेत शेतकऱ्याच्य बॅक खातेवर तसेच इतर विभागातील शेतकऱ्यांनी दिलेल्या बॅक खातेवर जमा केलेले आहे.तरी सर्व शेतकरी बांधवांनी बॅंकेतून आपापल्या ऊसबिलाची रक्कम घेऊन जाणे.तसेच हंगाम 2023-2024 करिता तोडणी वाहतुकीचे करार पूर्ण झाले असून तोडणी वाहतूक ठेकदारांना ॲडव्हान्सचे वाटप सुध्दा केलेले आहे.तसेच गाळप हंगाम 2023-2024 सुरू करनेच्या दृष्टीने कारखाना गाळप क्षमता विस्तार वाढीची व दुरुस्तीची कामे पूर्ण झालेली आहेत.त्यानुसार गाळप हंगाम 2023-2024 मध्ये कारखाना वाढीव क्षमतेने चालणार असुन हंगाम वेळेत सुरू करणार आहोत.तसेच गाळप हंगाम 2023-2024 मध्ये कारखान्याचे जास्तीत जास्त ऊस गाळप करण्याचे उदीष्ट आहे.तरी गतवर्षीप्रमाणे हंगाम 2023-2024 मध्ये सुध्दा ऊस उत्पादक शेतकरी बंधूनी जास्तीत जास्त ऊस गाळपास पाठवून सहकार्य करावे असे आवाहन आयान मल्टीट्रेड एल.एल.पी चे संचालक सचिन सिनगारे यांनी केले आहे.
यावेळी बाणगंगा कारखान्याचे चेअरमन मा.आ.राहुल भैय्या मोटे, व्हा.चेअरमन,महादेव आबा खैरे व सर्व संचालक मंडळ, जनरल मॅनेजर संतोष तोंडले, मुख्य शेती अधिकारी विठ्ठल मोरे, चीफ इंजिनिअर राजेशकुमार शिंदे,डिस्टीलरी मॅनेजर हनुमंत जगताप,चीफ अकौंटट विशाल सरवदे,सिव्हील इंजिनियर बंडगर, स्टोअर किपर नानासाहेब जाधव तसेच कारखान्याचे सर्व विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बाणगंगा साखर कारखान्याचे चेअरमन मा.आ. राहुल भैय्या मोटे व सर्व संचालक मंडळ यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.अजित दादा पवार व आयान मल्टीट्रेडचे संचालक सचिन सिनगारे यांचे आभार मानले.
आयान-बाणगंगा साखर कारखान्याने गाळप हंगाम 2018-2019 पासून ते गाळप हंगाम 2022-2023 पर्यंत नेहमी या भागातील कारखान्यापेक्षा चांगला ऊस दर दिलेला असुन ऊस उत्पादक शेतकरी यांचे हित जोपासनारा साखर कारखाना आहे.आयान-बाणगंगा साखर कारखान्याचा वजन काटा अगदी तंतोतंत असुन याबाबत ऊस उत्पादक शेतकरी व तोडणी वाहतुक ठेकेदार यांनी नेहेमी समाधान व्यक्त केलेले आहे. गाळप हंगाम 2023-2024 करिता कारखान्याचे आधुनिकीकरण व विस्तारीकरण केले असुन कारखान्याच्या गाळप क्षमतेमध्ये वाढ केलेली आहे. कारखाना वाढीव क्षमतेने वेळेत सुरू होणार आहे. त्याप्रमाणे तोडणी वाहतूक करार व यंत्रणेचे योग्य नियोजन केले आहे.तरी भागातील ऊस उत्पादक शेतकरी यांनी कारखान्यास ऊस देऊन सहकार्य करावे
चेअरमन
मा.आ.राहुल भैय्या मोटे.