back to top
Monday, December 23, 2024
Google search engine
Homeताज्या बातम्याउपोषणकर्त्यांवर लाठी हल्ला करणाऱ्यावर गुन्हे दाखल करा,परंडा सकल मराठा समाजाची मागणी

उपोषणकर्त्यांवर लाठी हल्ला करणाऱ्यावर गुन्हे दाखल करा,परंडा सकल मराठा समाजाची मागणी


राज्य सरकारच्या निषेधार्थ परंडा शहर कडकडीत बंद ठेऊन रास्ता रोको आंदोलन


तालुक्याच्या ग्रामीण भागात टायर पेटऊन मराठा समाजाच्या उपोषणकर्त्यावर झालेल्या लाठी हल्याचा निषेध



परंडा ( दि.२ सप्टेबर) जालना जिल्हयातील अंतरवली सराडी येथिल मराठा समाजाच्या आरक्षण मागणी साठी सुरू असलेल्या आंदोलकावर लाठी हल्ला करणाऱ्या पोलिसांवर गुन्हे दाखल करावे अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने तहसिलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

      जालना जिल्हयातील अंतरवली सराडी येथे सकल मराठा समाजाच्या आरक्षण मागणीसाठी अंदोलकरणाऱ्या आंदोलकावर पोलिसांनी केलेल्या अमानूष लाठी हल्ल्याने मराठा समाजा मध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या असुन राज्य सरकारच्या व जालना पोलीस प्रशासनाच्या निषेधार्थ दि २ सप्टेबर रोजी सकल मराठा समाजाच्या वतीन परंडा शहर कडकडीत बंद ठेऊन शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

           सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारलेल्या परंडा शहर बंदला शहरातील व्यापाऱ्यांनी उत्सफुर्त प्रदिसात देत संपुर्ण व्यावसाय बंध ठेऊन सकल मराठा समाजाच्या अंदोलनाला. पाठीबा दर्शीवला तर शहरात येणारी व शहरातून जानारी एस टी बस वाहतूक पूर्ण बंद होती.

     परंडा शहरा सह तालूक्याच्या  ग्रामीण भागात सकल मराठा समाजाच्या वतीने रस्त्यावर ठिकठिकानी टायर पेटऊन जालना येथे आरक्षण मागणी साठी अंदोलन करणाऱ्या सकल मराठा समाजाच्या आंदोलकावर झालेल्या लाटी हल्याचा तिव्र निषध करण्यात आला.

        परंडा येथिल छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात या आंदोलनास आरपीआय चे राज्य सरचिटणीस संजयकुमार बनसोडे,एमआयएम चे तालूका अध्यक्ष जमील पठाण, राष्ट्रवादी सामाजीक न्याय विभाााचे जिल्हा अध्यक्ष राहुल बनसोडे, राष्ट्रीवादी कॉग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष ॲड.संदिप पाटील, स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे तालूका अध्यक्ष शंकर घोगरे यांनी पाठींबा देऊन रास्ता रोको अंदोलनात सहभ नोंदवला.

       यावेळी डॉ.प्रशांत मांजरे, राहुल बनसोडे,संजयकुमार बनसोडे,शरद नवले,निशिकांत क्षिरसागर,महेश शिंदे,आशाताई मोरजकर,समाधान खुळे यांनी सकल मराठा समाजाला आरक्षण मागणी सदंर्भात विचार व्यक्त करून जालना जिल्हयातील अंतरवली सराडी येथे सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी उपोषणास बसलेल्या उपोषण कत्यावर पोलीस प्रशासनाने केलेल्या लाटी हल्याचा तिव्र निषध केला.

      यावेळी सकल मराठा समाजाच्या महिलाच्या हस्ते तहसिलदार घनशाम आडसुळ, यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.

     यावेळी मराठा सेवा संघाचे तालूका अध्यक्ष गोरख मोरजकर, संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज कोळगे, संभाजी ब्रिगेडचे तालूका अध्यक्ष समाधान खुळे,आंगद धुमाळ,शरद नवले,महेश शिंदे,रवि मोरे,शशिकांत जाधव, निशिकांत क्षिरसागर,नानासाहेब मांडवे,देवानंद टकले,जयदेव गंभीर,सुर्यकांत बोराडे, राजेश काळे,नागनाथ पाटील, भाऊसाहेब खरसडे,राजकुमार देशमुख,जावेद पठाण,गणी हावरे, नाना शिदे,शिवाजी शिदे,रामेश्वर नेटके,गणेश चव्हाण विशाल पवार, प्रदिप लटके,तुकाराम गायकवाड, मालिक सय्यद, तानाजी बनसोडे, सलीम हानुरे,नसीर शहाबर्फीवाले, विठ्ठल जाधव,विश्वास गुडे,पंकज नांगरे,कुनाल जाधव,सचिन पाटील, सचिन सोनारीकर,शंकर चव्हाण,नंदू शिंदे,श्रीहरी नाईकवाडी, आजिनाथ शेळके, बाळासाहेब पाटील, मनोहर मिस्कीन,राहुल खरसडे, प्रविण गरड,आझर शेख, सुर्यकांत कदम यांच्यासह जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्षा आशाताई मोरजकर,निता मिस्कीन, सुप्रीया गटकुळ,सुचिता खैरे,शिवाणी काळे,सुनिता भगत मिनाक्षी काळे, बालीका शिंदे, सुप्रीया भांडवलकर, राणी कोळगे, आश्वनी गवारे,पुणम सावंत, यांच्या सह शेकडो बहुजन समाज बांधव उपस्थित होते.

   अंदोला दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडुनये यासाठी पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार,पोलीस निरीक्षक कविता मुसळे यांच्या मार्गदर्शना खाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments