रा.गे शिंदे महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष रा. गे.शिंदे गुरुजी यांच्या ९९ व्या जयंतीनिमित्त महाविद्यालयात भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन

0
87


 परांडा (दि.२ सप्टेंबर) परंडा येथील श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे शिंदे महाविद्यालय परांडा येथे संस्थापक अध्यक्ष कै.रा गे शिंदे गुरुजी यांच्या ९९ व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .     

        जयंतीनिमित्त दि३सप्टेंबर ते ७ सप्टेंबर दरम्यान बुद्धिबळ स्पर्धा, रांगोळी स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा,चित्रकला स्पर्धा,विज्ञान प्रदर्शन,ग्रंथ प्रदर्शन, रक्तदान शिबिर,वैज्ञानिक जाणीव व दृष्टीकोण आणि दि ७ सप्टेंबर रोजी शहरात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे .या रॅलीमध्ये बैलगाडी मध्ये मिरवणूक काढण्यात येत आहे. झांज पथक लेझीम पथक या रॅलीचे खास आकर्षण असणार आहे.

       या कार्यक्रमासाठी श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद या संस्थेचे सचिव संजय निंबाळकर, अध्यक्ष सुनील शिंदे,संस्थेच्या सहसचिव मंगल उर्फ शीलाताई देठे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.जयंतीनिमित्त कार्यक्रमांमध्ये आयोजीत केलेल्या विविध स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा.स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना विविध पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे असे आव्हान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील जाधव यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here