समुद्रवाणी गावात मराठा आरक्षणासाठी मुंबईतील उपोषणाला पाठिंबा

0
77

धाराशिव तालुक्यातील समुद्रवाणी गावात आज मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मुंबईतील मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी साखळी पद्धतीने उपोषण सुरू करण्यात आले आहे.

आजच्या उपोषणात सहभागी झालेले आहेत:

  • संतोष महादेव घुले
  • सोमनाथ चंद्रसेन पाटील
  • सूर्योदय सतीश कदम

समुद्रवाणी गावातील गावकऱ्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवून स्थानिक पातळीवरही आरक्षणाच्या मागण्यांकडे लक्ष वेधले. मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरंगे पाटील उपोषण करत असताना गावगावातील मराठा समाजाने देखील आपली भूमिका ठाम पद्धतीने मांडली आहे.

उपोषणाच्या माध्यमातून मराठा आरक्षणासाठी समाजाची एकजूट आणि इच्छाशक्ती स्पष्ट होते. ग्रामीण भागातील या कृतीमुळे आरक्षणाच्या मागण्यांबाबत स्थानिक आणि राज्य प्रशासनाच्या लक्षात पुन्हा एकदा येण्याची शक्यता आहे.

  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here