शेतकरी हितासाठी 200 रुपयांचा अंतिम हप्ता देण्याची घोषणा
धाराशिव – तुळजापूर तालुक्यातील देवकुरुळी येथील श्री सिद्धिविनायक ॲग्रीटेक युनिट क्र. 1 आणि खामसवाडी येथील श्री सिद्धिविनायक ग्रीनटेक युनिट क्र. 2 या दोन्ही गुळ कारखान्यांच्या 2025-26 गळीत हंगामाचा प्रारंभ रविवारी (दि. 10) पारंपरिक रोलर पूजनाने झाला. संस्थापक अध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या हस्ते सहकुटुंब धार्मिक विधीपूर्वक पूजन करण्यात आले.
या प्रसंगी कारखाना परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी, ग्रामस्थ तसेच श्री सिद्धिविनायक परिवारातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. मागील चार-पाच वर्षांपासून ऊस गाळप व्यवसायात सातत्य राखत असलेल्या या दोन्ही युनिट्सबद्दल शेतकऱ्यांचा विश्वास दृढ झाला आहे. मागील हंगामात सुमारे 2.25 लाख मेट्रिक टन ऊस गाळप झाले होते. यंदा तीन लाख मेट्रिक टनांपेक्षा अधिक गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, प्रतिदिन तीन हजार मेट्रिक टनांपेक्षा जास्त गाळप करण्याचे नियोजन असल्याची माहिती दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी दिली.
शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीला प्राधान्य देत जलद पेमेंट पद्धत राबवली जात असल्याचेही त्यांनी नमूद केले. ऊस खरेदी झाल्यानंतर अवघ्या 15 ते 45 दिवसांत रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाते. तसेच, हंगाम 2024-25 मधील उर्वरित ऊस बिलाचा 200 रुपयांचा अंतिम हप्ता बैलपोळ्याच्या सणानिमित्त देण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.
या कार्यक्रमाला श्री. दिनेश कुलकर्णी, श्री. गणेश कामटे, श्री. बालाजी कोरे, श्री. राजकुमार जाधव, श्री. अरविंद गोरे, श्री. देविदास कुलकर्णी, श्री. गजानन पाटील, श्री. मंगेश कुलकर्णी, श्री. विकास उबाळे, श्री. अभय शिंदे, श्री. बालाजी जमाले, श्री. संजीव शिलवंत, श्री. मकरंद ढोबळे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. प्रतीक देवळे यांनी केले.
- राज्यातील १२ जिल्हा परिषदा व १२५ पंचायत समित्यांसाठी ५ फेब्रुवारीला मतदान; ७ फेब्रुवारीला मतमोजणी
- तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक
- दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केले गजाआड
- ॲट्रॉसिटी अर्थसाह्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी लाच मागणारा समाजकल्याण कार्यालयातील कनिष्ठ लिपिक लाचलुचपत विभागाच्या ताब्यात
- रामदास आठवले यांची जाणीवपूर्वक विनोदी प्रतिमा तयार करून आंबेडकरी चळवळीचे नुकसान वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना प्रा. सुषमा अंधारे यांची दीर्घ पोस्ट
