येडशी (ता. धाराशिव) येथे हजरत जमादार बाबा रहे यांच्या ऊरूसाचा तीन दिवसीय भव्य सोहळा उद्या 11 ऑगस्टपासून सुरू होत आहे. 13 ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सवासाठी जिल्ह्यासह परराज्यातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमानुसार, 11 ऑगस्ट रोजी संदल मिरवणूक, 12 ऑगस्ट रोजी ऊर्स शरीफ, तर 13 ऑगस्ट रोजी जियारत व महाप्रसाद होणार आहे. विशेष आकर्षण म्हणून 12 ऑगस्ट रोजी कव्वालीची मैफल रंगणार असून, पुण्यातील प्रख्यात कव्वाल परविन काचवाली आणि हैदर नाझाँ यांच्या जुगलबंदीचा मुकाबला भक्तांना मंत्रमुग्ध करणार आहे.
दर्गाह परिसरात भक्तीचा दरबार सजविण्यात येणार असून, सर्वांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन ऊरूस कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.
- विधान परिषदेसाठी दत्ताभाऊ कुलकर्णींची ताकद वाढली; तीन जिल्ह्यांतील 252 सदस्यांचा पाठिंबा असल्याची चर्चा
- रामाच्या आणि कृष्णाच्या आशीर्वादानं चालणाऱ्या महाविद्यालयात छेडछाडीच्या प्रकरणात प्रभारी प्राचार्य पुतण्याने वाचवलं काकाला!
- महिलांचे मंगळसूत्र चोरणारी टोळी जेरबंद; ४ आरोपींसह ८.३८ लाखांचा मुद्देमाल जप्त
- आमदार तानाजीराव सावंत यांनी दिलेला शब्द पाळला..!
- अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून फोटोच्या जोरावर ब्लॅकमेल; लव्ह जिहादचा आरोप, नराधम पोलिसांच्या ताब्यात
