धाराशिव, दि. 05 ऑगस्ट 2025: धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी उपजिल्हाधिकारी (आरडीसी) यांच्या दालनात अवैध बांधकाम आणि अनधिकृत वातानुकूलित यंत्रणा बसवल्याचा गंभीर आरोप करणारा तक्रार अर्ज जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला आहे. केशेगाव (ता. व जि. धाराशिव) येथील रहिवासी श्री. लहू रामा खंडागळे यांनी हा अर्ज दाखल करून याप्रकरणी सखोल चौकशी आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
अर्जानुसार, निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या दालनात खिडकीच्या आत एक भिंत बांधून बांधकाम मानांकन नियमांचे उल्लंघन करण्यात आले आहे. हे बांधकाम केव्हा, कोणाच्या परवानगीने आणि वैध आहे की अवैध, याची तपासणी करण्याची मागणी अर्जदाराने केली आहे. तसेच, दालनात परवानगीशिवाय वातानुकूलित यंत्रणा बसवल्याचा दावा करत, याची परवानगी वरिष्ठांकडून घेतली आहे की नाही, याचीही चौकशी व्हावी, असे अर्जात नमूद आहे.
श्री. खंडागळे यांनी पुढे मागणी केली आहे की, जर हे बांधकाम अवैध ठरले, तर बांधकामाचा खर्च संबंधित अधिकाऱ्यांच्या वेतनातून वसूल करावा. तसेच, अवैध बांधकाम पाडून आणि अनधिकृत वातानुकूलित यंत्रणा तात्काळ काढून टाकण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती त्यांनी केली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय हे प्रशासनाचे केंद्रीय कार्यालय असून, येथील बांधकामे कायदेशीर आणि नियमानुसार असणे अपेक्षित आहे. या तक्रारीने कार्यालयातील पारदर्शकता आणि नियमांचे पालन यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. याप्रकरणी जिल्हाधिकारी कोणती कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

- अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून फोटोच्या जोरावर ब्लॅकमेल; लव्ह जिहादचा आरोप, नराधम पोलिसांच्या ताब्यात
- धाराशिव नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत छुप्या युतीत ठिणगी? भाजप आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांत गोंधळ!
- सर्वसाधारण सभा, स्थायी समितीचे इतिवृत्त गायब? धाराशिव नगरपरिषदेत पारदर्शकतेचा बोजवारा?आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या पारदर्शक कारभाराच्या दाव्याचा फुगा फुटला!
- परंडा तालुक्यात माजी सैनिकाच्या घरी सशस्त्र दरोडा; २४ तासांत टोळी जेरबंद, गुन्हे शाखेची कामगिरी
- टेक्सटाईल पार्कवरून आ. राणाजगजितसिंह पाटील यांचा यू -टर्न?;
कौडगावसाठी डिफेन्स हबचे नवे आश्वासन, जुन्या बाटलीत नवी दारू!
