शिवसेना व आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचा पुढाकार; उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या हस्ते धनादेश सुपूर्द
धाराशिव : येडशी येथे घडलेल्या दुर्घटनेतील आपत्तीग्रस्त कृष्णा गोविंद करंडे यांना आधार देण्यासाठी शिवसेना आणि आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ पुढे सरसावले आहे. मंगळवारी (दि. २४ नोव्हेंबर) राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत व खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या हस्ते करंडे यांना एक लाख रुपयांच्या आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर अण्णा पाटील यांच्या पुढाकारातून संस्थेच्या वतीने ही आर्थिक मदत देण्यात आली. दुर्घटनेमुळे संकटात सापडलेल्या करंडे कुटुंबीयांना ‘फूल ना फुलाची पाकळी’ या भावनेतून मदतीचा हात देण्यात आला. संकटाच्या काळात समाजातील आपत्तीग्रस्त घटकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याच्या सामाजिक बांधिलकीतून हा उपक्रम राबविण्यात आला.
याप्रसंगी खासदार ओमराजे निंबाळकर, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर अण्णा पाटील यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आर्थिक मदतीबद्दल कृष्णा करंडे व त्यांच्या कुटुंबीयांनी सर्वांचे आभार मानले.
- येडशी दुर्घटनेतील कृष्णा करंडे यांना एक लाख रुपयांची आर्थिक मदत
- ‘युवाशक्ती जागर यात्रे’चा २५ नोव्हेंबरला तुळजापुरातून प्रारंभ
- ‘राजकारण कुठल्या स्तराला जाऊ शकतं, हे शिरसाठांच्याच तोंडून आलं!’
- धाराशिव शहरातील युवकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश!
- ज्ञान प्रबोधिनीच्या माध्यमातून शेती विकास, जलसंवर्धनासह महिला सक्षमीकरणाला चालना,
