भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष धाराशिव जिल्हा दौऱ्यावर; युवकांशी संवाद साधून संघटनात्मक बांधणीवर देणार भर
धाराशिव : भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आयोजित ‘युवाशक्ती जागर यात्रे’च्या मराठवाडा दौऱ्याला बुधवार, दि. २५ नोव्हेंबर रोजी तुळजापूर येथून प्रारंभ होणार आहे. भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन या यात्रेचा शुभारंभ करणार आहेत. या निमित्ताने ते धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून, जिल्ह्यात विविध संघटनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
युवकांमध्ये संघटनात्मक जागृती निर्माण करणे, पक्षसंघटनेचा विस्तार करणे तसेच युवकांना सामाजिक आणि राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात सहभागी करून घेणे, हा या यात्रेचा प्रमुख उद्देश आहे. या दौऱ्यादरम्यान जिल्ह्यातील विविध ठिकाणी युवकांशी संवाद साधण्यात येणार आहे. त्याचबरोबर भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका आयोजित करण्यात येणार आहेत.
या बैठकांमध्ये युवकांचे प्रश्न, संघटनात्मक बांधणी, आगामी उपक्रम आणि पक्षसंघटना अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने चर्चा होणार आहे. तसेच युवा मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना प्रदेशाध्यक्षांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
‘युवाशक्ती जागर यात्रा’च्या माध्यमातून युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याबरोबरच संघटनात्मक कार्याला गती देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. युवकांचा सामाजिक उपक्रमांमधील सहभाग वाढवणे आणि राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात युवा पिढीला सक्रिय करणे, यावर यात्रेदरम्यान भर दिला जाणार असल्याचे भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने सांगण्यात आले.
दरम्यान, या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यातील भारतीय जनता युवा मोर्चाचे सर्व पदाधिकारी, मंडल अध्यक्ष, सरचिटणीस तसेच युवा कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून यात्रेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन भारतीय जनता युवा मोर्चाच्या धाराशिव जिल्हा शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.
- ‘युवाशक्ती जागर यात्रे’चा २५ नोव्हेंबरला तुळजापुरातून प्रारंभ
- ‘राजकारण कुठल्या स्तराला जाऊ शकतं, हे शिरसाठांच्याच तोंडून आलं!’
- धाराशिव शहरातील युवकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश!
- ज्ञान प्रबोधिनीच्या माध्यमातून शेती विकास, जलसंवर्धनासह महिला सक्षमीकरणाला चालना,
- दुष्काळग्रस्त शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या मदतीसाठी माजी मंत्री आ. प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन
