Home Blog Page 99

धाराशिव जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

धाराशिव – जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून प्रशासकीय कारणास्तव, विनंतीनुसार या बदल्या करण्यात आल्या आहेत.

वाचा – अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला मारहाण, भाजप नेत्यावर गुन्हा दाखल

अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला मारहाण, भाजप नेत्यावर गुन्हा दाखल

 

धाराशिव -महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी च्या कार्यकारी अभियंत्याला मारहाण प्रकरणी भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर पाटील यांच्यासह त्यांचा मुलगा अभिराम पाटील तसेच स्विय सहाय्यक स्वप्नील पाटील यांच्यावर उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की अतिरिक्त कार्यकारी अभियंता रविंद्र फकीरा पवार वय ५२ वर्षे यांनी सुधीर पाटील यांच्याविरोधात शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यानंतर पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार उस्मानाबाद  प्रभारी कार्यकारी अभियंता पवार हे एमएसईबी रेस्ट हाऊस सोलापुर रोडवरील पळसवाडी रोड लगत रेस्ट हाऊसचे पाठीमागील बाजुस मेजर स्टोअर मध्ये  कार्यालयीन कामकाज करत असताना सुमारे  ११.०० वाजण्याच्या सुमारास त्यांच्या सोबत स्टोअर किपर राजु काळे हा पण सोबत काम करत होता. सदर वेळी उस्मानाबाद येथील सुधीर केशवराव पाटील, अभिराम सुधीर पाटील, स्वप्नील पाटील व इतर दहा ते बारा लोक हे अचानक कार्यालयात येवून शिवीगाळ करत आले. त्यांनी शिवी देण्यांचे कारण विचारता सदर लोकांनी त्यांना गच्चीस धरून खाली पाडून लाथाबुक्यांने मारहाण करुन जिवे मारण्यांची धमकी दिली अशी तक्रार अतिरिक्त कार्यकारी अभियंता रवींद्र पवार यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कलम, ३५३, ३३२,५०४,५०६, १४३,१४७,१४९ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दैनिक जनमत २४ मार्च २०२३ E paper

हमारी धरोहर योजना आता 2022-23 या वर्षापासून प्रधान मंत्री विरासत का संवर्धन ( पीएम विकास) या योजनेत समाविष्ट

 


दिल्ली –

हमारी धरोहर योजना आता 2022-23 या वर्षापासून प्रधान मंत्री विरासत का संवर्धन ( पीएम विकास) या योजनेत समाविष्ट केली आहे . यामागे कौशल्य विकास, शिक्षण आणि नेतृत्वगुण प्रशिक्षण या उद्योगक्षमतेला हातभार लावणाऱ्या गोष्टींमधून अल्पसंख्यांकांमधील विशेषतः कारागिरांची रोजगाराची स्थिती सुधारणे हा उद्देश आहे.

हमारी धरोहर ही योजना भारतातील अल्पसंख्य समाजाची समृद्ध परंपंरा जतन करण्यासाठी तयार केली गेली आहे. भारतीय परंपरा या संपूर्ण संकल्पने अंतर्गत अल्पसंख्यांकांच्या समृद्ध वारश्याचं जतन प्रदर्शन भरवणे, साहित्य आणि लेखन इत्यादी जतन करणे यासाठी ही योजना आहे. अल्पसंख्यांक समुदायाच्या वारसा वास्तूंचे जतन हे या योजनेत अंतर्भूत नाही. 

सार्वजनिक सुव्यवस्था हा भारताच्या घटनेच्या 7 व्या अनुसूचीनुसार  राज्यांचा विषय आहे.   कायदा व सुव्यवस्था राखणे, अल्पसंख्याकांसह सर्व नागरिकांच्या जीवित तसेच मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांची नोंदणी आणि खटला चालवण्याची जबाबदारी संबंधित राज्य सरकारांवर आहे. मंत्रालयाला राज्यांकडून अल्पसंख्याकांच्या वारसा वास्तूंच्या नुकसानीचा अहवाल मिळालेला नाही.केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री स्मृती  झुबिन इराणी यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

१ लाखाची लाच घेताना सरपंचपती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

 


धाराशिव – १ लाखाची लाच घेताना सरपंच पतीला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले असून त्याबाबत अधिक माहिती अशी की,तक्रारदार हे मेनकर एनर्जी  प्रा. लिमिटेड कंपनी मध्ये साईट सुपर वायझर म्हणून नेमणूकीस आहेत आणि कंपनीचे जल जीवन मिशन अंतर्गत सौर उर्जेंवर आधारित दुहेरी पंप लघुनळ योजनेचे 18,00,000/- (अठरा लाख रुपये) किमतीचे काम रोहकल, ता. परांडा, ज़िल्हा धाराशिव येथील 3 वस्तीवर  चालू असून यातील आरोपी हनुमंत पांडुरंग कोलते , वय 43 वर्षे, व्यवसाय शेती, सरपंचपती (खाजगी इसम ), रा. रोहाकल, ता. परांडा, ज़िल्हा धाराशिव यांनी  सदर योजनेचे काम थांबवून ते पूर्ववत चालू करू देण्यासाठी यातील तक्रारदार यांना  दिनांक 22/03/2023 रोजी चालू असलेल्या तीन्ही कामाचे प्रत्येकी 50,000/- रुपये प्रमाणे 1,50,000/- रुपये किंवा सोलरच्या तीन प्लेट व त्याचे साहित्य अश्या लाचेची मागणी पंचांसमक्ष करून तडजोडी अंती 1,00,000/- रुपये लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य करून आज दिनांक 23/03/2023 रोजी 1,00,000/- रुपये लाच रक्कम ज़िल्हा परिषद उपहार गृह धाराशिव येथे पंचांसमक्ष स्विकारल्याने आरोपी  यांना ताब्यात घेतले असुन पोलीस स्टेशन आनंदनगर, धाराशिव  येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.


आणखी वाचा –  अव्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठीही जात प्रमाणपत्र पडताळणी अनिवार्य


शरद पवार ग्रामसमृध्दी योजनेत हा झाला बदल


धाराशिव जिल्ह्याकरिता दिनांक २२ ते २६ मार्च, २०२३ साठी कृषि हवामान अंदाज व हवामान आधारित कृषि सल्ला पत्रिका

धाराशिव – प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई कडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार धाराशिव जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवस आकाश स्वछ ते अंशतः ढगाळ राहून दिनांक २४ व २५ मार्च, २०२३ रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना, वादळी वारा (३० ते ४० कि.मी./तास) व विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची शक्यता आहे.

अव्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठीही जात प्रमाणपत्र पडताळणी अनिवार्य

रुग्णालयातील मेडिकल मधून औषधे घेण्याची सक्ती करता येत नाही

जिल्हानिहाय वसतीगृहे सुरु करणेबाबत कार्यपध्दती व नियमावली

अव्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठीही जात प्रमाणपत्र पडताळणी अनिवार्य



मुंबई – आतापर्यंत व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र आवश्यक होते, येणाऱ्या काळात अव्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठीही जात प्रमाणपत्र पडताळणी अनिवार्य करण्यात येणार असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी विधानपरिषदेत दिली. सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे सुरू असून त्या अधिवेशनात ही घोषणा करण्यात आली आहे.


हे आहेत अव्यवसायिक अभ्यासक्रम

कला आणि ललित कला, मानसनिती व समाजशास्त्र  विद्याशाखेत –  बी ए आणि एम ए

वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखेत बी. कॉम., एम. कॉम.

विज्ञान विद्याशाखेत बी.एस्सी., एम.एस्सी.

हे आहेत व्यावसायिक अभ्यासक्रम 

कला आणि ललित कला विद्याशाखेत
बी. एफ. ए., एम. एफ. ए.

मानसनिती व समाजशास्त्र  विद्याशाखेत 
बी. एस. डब्ल्यु., एम. एस. डब्ल्यु., बी.लिब. एम.लिब., डि.पी.ए., बी.सी.जे., एम.सी.जे.

वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखेत 
बी.बी.ए., बी. बी. एस., बी.बी.एम. ( ई-कॉम) बी.सी.ए., एम.बी.ए., एम. पी. एम., एम. सी. एम., एम. एम. एस., डी. बी. एम., डी.सी.एम., डी.सी.ए., ओ.डी.एस.टी. एम., डी. एम. अॅन्ड ई. एम. आय., एम. बी. एम. (मॅनेजमेंट स्टडीज / पर्सोनल मॅनेजमेंट / ), एम. बी. एम. (मॅनेजमेंट स्टडीज) बी. ई कॉमर्स, पी. जी. डिप्लोमा (डिझायस्टर मॅनेजमेंट)

विज्ञान विद्याशाखेत 
एम. सी. ए.

शिक्षण शास्त्र विद्याशाखेत
बी.एड., बी.पी.एड.,
बी.पी.ई., एम. एड., एम.पी.एड.

अभियांत्रिकी विद्याशाखेत
बी. ई., बी. टेक., बी. कैम., बी. आर्की, एम. ई. एम. आर्की., एम. टेक.

विधी विद्याशाखेत
एलएल.बी., बी.एस.एल., बी.ए.एल.एल.बी. एलएल. एम. डी. टी. एल., डी. एलएल. अॅन्ड एल. डब्ल्यु.

औषधनिर्माण विद्याशाखेत
बी. फार्मसी., एम. फार्मसी, बी. टेक. (कॉस्मेटीक)

 शरद पवार ग्रामसमृध्दी योजनेत हा झाला बदल
रुग्णालयातील मेडिकल मधून औषधे घेण्याची सक्ती करता येत नाही